राज्यस्तरीय पालक बालक परिषद- 2020 संपन्न
पालक जागृत झाल्याशिवाय शिक्षण व्यवस्था कधीच बदलणार नाही-डॉ श्री प्रशांत खांडे
पुणे: (सौ वृत्तसंकलन प्रतिनिधी)
पुणे येथून आँनलाईन राज्यस्तरीय पालक-बालक परिषद संपन्न झाली.ही परीषद कोरोनाच्या संकटात,लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हि परिषद ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली.
अखिल रयत सेवक क्रांतिकारी संघ संस्थांच्या योगदानाने हि परिषद अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
परिषदेत सर्वाचे स्वागत आणि प्रस्तावना संघाचे चे संस्थापक अध्यक्ष डॉ श्री. प्रशांत खांडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, "देशाचा विकास आणि शिक्षण कसे महत्वाचे आहे ते सांगितले, तसेच पालकांना आणि शाळेंना असलेले प्रश्न कोणते आणि त्यासाठी हि परिषद कसे योगदान देणार ते स्पष्ट केले।
सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या राज्यस्तरीय परिषदेत तज्ञ मार्गदर्शक नारायण भानवसे सर- संस्थापक ज्ञानदीप शिक्षण संस्था, टेम्भुर्णी, महादेव खळूरे शिक्षक लातूर,वैशाली बाफना सिस्कॉम संस्था,पुणे, धर्मेश मिश्रा, परेन्ट्स असोसियशन, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. शाळा कशी असावी, फी किती असावी, पालकांनी काय करायला पाहिजे, असे विविध विषय श्रोत्यांना एक नवा विचार देऊन गेले.
पालक बालक परिषद यशस्वी करण्यासाठी कोअऱ टिम सदस्य डॉ मनीष राऊत यांनी सूत्र संचलन आणि हिमानी गांधी यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच अखिल रयत सेवक क्रांतिकारी संघच्या सर्वच कोअऱ टिमचे मोलाचे सहकार्य या परिषदेच्या आयोजनात लाभले आहे.