वाशिम जिल्ह्याची कोरोना स्थिती चांगली जिल्ह्यात आज आढळले ३८ कोरोना बाधित ३० जणांना डिस्चार्ज उपचार घेणारे रुग्नसंख्या फक्त ५३८

वाशिम जिल्ह्याची कोरोना स्थिती चांगली जिल्ह्यात आज आढळले ३८ कोरोना बाधित ३० जणांना डिस्चार्ज उपचार घेणारे रुग्नसंख्या फक्त ५३८


   कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १३


वाशिम जिल्ह्याची कोरोना स्थिती इतर जिल्ह्या च्या तुलनेत अतिशय चांगली असून जिल्ह्यात आज ३८ कोरोना बाधित आढळले असून ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे तर उपचार घेणारे रुग्नसंख्या फक्त ५३८ आहे काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार


     वाशिम शहरातील पंचशील नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, लाखाळा येथील १, माधवनगर येथील १, जैन कॉलनी येथील १, सुंदरवाटिका येथील १, क्रांती चौक येथील १, शेलूफाटा येथील १, सावळी येथील १, जांभरुण नावजी येथील १, भटउमरा येथील १, कोंडाळा महाली येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, इतर ठिकाणचा १, सवड येथील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. एक मधील १, इतर ठिकाणचा १, शेलगाव बोन्दाडे येथील १, डव्हा येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील २, इतर ठिकाणचे ३, मोहरी येथील ३, बेलखेड येथील १, पिंप्री खडी येथील १, चिखली येथील १, पिंप्री सुर्वे येथील १, तऱ्हाळा येथील १, शेंदूरजना येथील २, मसोला येथील १, कारंजा लाड शहरातील नगरपरिषद कॉलनी परिसरातील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


   दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १३५ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.