जिल्ह्या प्रशासन व आरोग्य यंत्रणा च्या प्रयत्नाला यश, जिल्ह्यात कोरोना स्थिरावला

जिल्ह्या प्रशासन व आरोग्य यंत्रणा च्या प्रयत्नाला यश, जिल्ह्यात कोरोना स्थिरावला


कारंजा : (संदीप क़ुर्हे) दि ०६


     वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा वाढता शिरकाव पाहता एक वेळ आरोग्य यंत्रणा हादरली की काय ? असे वाटत असताना जिल्ह्या प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून कोरोनाशी दोन हात करण्याचे उत्तम नियोजन केले आणि आज कोरोनाची उतरती कळा पाहता या दोन्ही यंत्रनेला आजच्या आकडेवारी वरुन यश प्राप्त झाले आहे जिल्ह्यात कोरोना स्थिरावलाचे दिसत आहे 


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील त्रिवेणी नगर परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील १, कोठा येथील १, किन्हीराजा येथील १, रिसोड तालुक्यातील मोप येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील ४, कारंजा रोड परिसरातील २, जांब रोड परिसरातील ४, सावरगाव येथील १, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, सार्सी येथील १, कारंजा लाड शहरातील टिळक चौक येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पोहा येथील १, खेर्डा येथील १, नागलवाडी येथील २, महागाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर बाधित आढळलेल्या ४८ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली आहे.