शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहिम
कारंजा (संदीप क़ुर्हे)
कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र शासनाने शेतकरी विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात काँग्रेस नेते युसूफ सेठ पुंजानीयांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे.
सदर मोहिमेचे उद्घाटन माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये वाशीम जिल्हा प्रभारी प्रकाश साबळे,वाशीम जिल्हाध्यक्ष ऍड. दिलीप सरनाईक, काँग्रेस नेते हाजी मो.युसूफ पुंजानी, तालुकाध्यक्ष रमेश लांडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सह्या घेण्यात येणाऱ्या निवेदनात नमूद केले आहे की, केंद्रातील भाजप सरकारने नुकतेच काळे कायदे पास केले आहे.यामुळे शेतकरी,शेतमजुर, हमाल व बाजार समित्यांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.केंद्र सरकार कृषी मालही देशातील मोठ्या भांडवल दारांच्या दावणीला बांधत आहे व त्यांनी सर्वच उद्योग विक्रीला काढले असल्याचे म्हटले आहे.तसेच यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पुढाकार घेतला असल्याचे म्हटले आहे व त्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रपतींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.त्यासाठी आज २४ ऑक्टोबर पासुन कारंजा तालुक्यातून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांना माणिकराव ठाकरे म्हणाले की,केंद्र सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी विरोधी तीन काळे यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. तर युसूफ पुंजानी म्हणाले की, सविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवून कोणतेही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत. शेतकºयांच्या हक्कासाठी, संघर्ष हक्कासाठी, शेतकºयांच्या भविष्यासाठी नवीन शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करण्यात यावी. याकरीता हुकुमशाही केंद्र सरकार विरोधात जिल्हा भर शेतकरी बचाव तसेच शेतकरी स्वाक्षरी मोहीम वरिष्ठांच्या आदेशाने सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा प्रास्तविक शहराध्यक्ष हमीद शेख यांनी केले.व संचालन ऍड.संदेश जिंतूरकर यांनी तर आभार ऍड.फिरोज शेकुवाले यांनी मानले.यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक ,सभापती तसेच बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.