जिल्ह्याला आज दिलासा जिल्ह्यात ४३ कोरोना बाधित एकूण पॉझिटिव्ह – ३२५४ कारंजात आयोजित रैपिड एंटीजन टेस्ट च्या दुसऱ्या टप्प्यात झाल्या २२४ टेस्ट

जिल्ह्याला आज दिलासा


जिल्ह्यात ४३ कोरोना बाधित एकूण पॉझिटिव्ह – ३२५४  


     कारंजात आयोजित रैपिड एंटीजन टेस्ट च्या दुसऱ्या टप्प्यात झाल्या २२४ टेस्ट 


 कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि १८


  आज जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त अहवालात जिल्ह्याला थोडाफार दिलासा मिळाला आहे तर कारंजा शहरात आयोजित रैपिड एंटीजन टेस्ट च्या दुसऱ्या टप्प्यात एकूण २२४ रैपिड एंटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत 


   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, सिंधी कॅम्प येथील १, काळे फाईल येथील २, महेश भवन परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ३, शिरपुटी येथील ४, काटा येथील २, सोनखास येथील १, मोठा उमरा येथील २, दुबळवेल येथील १, येवती येथील १, सावळी येथील १, पार्डी आसरा येथील १, खारोळा येथील १, कोंडाळा येथील १, ब्रह्मा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, एकता नगर येथील १, लोणी रोड येथील १, गोवर्धन येथील ५, मोरगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील २, अमानी येथील १, झोडगा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ७६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


     कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ३२५४


ऍक्टिव्ह – ७९२


डिस्चार्ज – २४०४


मृत्यू – ५७ 


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)