आत्मनिर्भर भारत अभियान्तर्गत कोरडवाहु कास्तकारकरिता उत्पन्न वाढी करीता सुवर्ण संधी कारंजा: (अमित संगेवार)
कारंजा तालूक्यामधील कोरडवाहू शेतकरी बांधवाना करीता उत्पन्न वाढावे याकरिता ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ,इंडस्ट्रीज अॅन्डअॅग्रिकल्चर तर्फे आत्मनिर्भर भारत आभियानाअंतर्गत तेलबिया जसे करड़ी, सोयाबीन, भुईमूंग,सारख्या वाणा प्रोत्साहन मिळूण मोठया वाढ होण्या करिता ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ,इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर च्या वतीने वाशिम जिल्हा तथा कारंजा तालूका मधील कोरडवाहू शेतकरी करीता बियाणे व माल विकत घेण्याच्या दुष्टी ने अभियान संदर्भत जिल्हा समन्वयक संदीप अंजनकर यांच्या अध्यक्षते खाली दि 28-9-20 रोजी सकाळी 9 वाजता रामगंगाई नृतन कॅलनी कारंजा येथे चर्चासत्रा चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये तालूका समन्वयक श्याम सवाई यांनी ह्या प्रकल्पा बाबत मार्गदर्शन करुण करडी च्या बियाणे करीता 50%रक्कम मदत म्हणून दिल्या जाणार असून आणी तसा करार करून करडी व भूईमुंग माल बाजार भावाच्या 10% अधिक दराने खरेदी केला जाईल अशी यंत्रणा उभी झाली असून केवळ करडी बियाणे खरेदी करीता 50% निधी शेतकरी च्या खात्यात जमा होणार असल्याचे सवाई यांनी सांगितले या करीता शेतकरी बांधवाणी आपली नोंदणी करणे अवश्यक असून संदीप अंजनकर एकलव्य सोर्टप बायपास , श्याम सवाई रामगंगाई नृतन कॅलनी कारंजा,हनुमंत मदने अभिजित अग्रो एंजसी शिवाजी नगर ,येथे आपले आधार कार्ड ,सातबारा,व स्वयघोषणा पत्र आणी केवळ 1 रुपया नोंदणी देऊन ऑन लाईन नोदणी करणे अवश्यक आहे ज्या शेतकरी मंडळी ची नोदणी झाली असेल त्यांच्या मालाची पतवारी प्रमाणे खरेदी केल्या जाणार असून परिसरात पेरा वाढल्यास कांरजा भागात तेल घाणी व्दारे रोजगार निर्मिती ला सुद्धा संधी आहे या कार्य करीता ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ,इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर चे विभागीय सल्लागार देवचंद कावळे सरा चे मार्गदर्शन लाभत आहे ,कारंजा तालूक्या मधील ग्रामीणभागात शेतकरी मित्र सुध्दा जोडण्याचे असून ज्या युवकाना यात काम कराचे असेल त्यांनी श्याम सवाई 9371871584 यांच्या शी सपंर्क करन्याचे आवाहन करण्यात आले आहे