"हेमंत पापळे कृतीशील शिक्षक २०२०"पुरष्काराने सन्मानित

"हेमंत पापळे कृतीशील शिक्षक २०२०" पुरष्काराने सन्मानित


कारंजा:(संदीप क़ुर्हे)


     महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग अकोला जिल्हा यांचे वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टे ला दुपारी २ वाजता शिक्षक दिना चा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी दरवर्षी प्रमाणे अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना "कृतीशील शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले 


यामध्ये जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा मोझर येथील सहा शिक्षक हेमंत साहेबराव पापळे यांना ''कृतीशील शिक्षक २०२० पुरष्काराने सन्मानित करण्यात आले 


 ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून


 मा. आ. डॉ. रंजीतजी पाटील माजी पालकमंत्री अकोला जिल्हा तथा पदविधर आमदार, तर


कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड. मोतिसिंहजी मोहता


अध्यक्ष बि. जी. ई. सोसायटी अकोला प्रमुख अतिथी म्हणून मा.वसंतराव खोटरे(माजी शिक्षक आमदार)


मा.चंद्रशेखरजी पांडे गुरुजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद अकोला मा प्रकाशजी मुकुंदशिक्षणाधिकारी माध्यमिक मा. देवेंद्रजी अवचार उपशिक्षणाधिकारी माध्यमिक मा.रतणसिंगजी पवार गटशिक्षणाधिकारी 


सर्व सन्माननीय अध्यक्ष शिक्षक संघटना सर्व


(प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक ,महाविद्यालय, मुख्याध्यापक व आश्रम शाळा) आदिनची उपस्थिति लाभली होती.


कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे हा सन्मान सोहळा कोव्हीड १९ च्या नियमांचे पालन करीत फेसबुक वर ऑनलाइन सोहळा साजरा करण्यात आला