कारंजा बसस्थानकावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भाउसाहेब लहाने यांचे मार्गदर्शनात कारंजा सास च्या मदतीने जखमी वर झाले ऑन दी स्पॉट उपचार

कारंजा बसस्थानकावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भाउसाहेब लहाने यांचे मार्गदर्शनात कारंजा सास च्या मदतीने जखमी वर झाले ऑन दी स्पॉट उपचार


 कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि २६     


कारंजा बसस्थानकावरील परिसरात एक इसम जखमी अवस्थेत असून त्याला उठता बसता येत नसल्याची माहिती परिसरातील दुकानदार राजू ढोके यानी सास प्रमुख श्याम भाउ सवाई यांना दिली


      मदत कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या श्याम सवाइ यांनी वेळ न गमावता आपत्कालीन संस्था प्रमुख आपल्य चमु सह घटना स्थळी पोहचले आणी सदर माहिती तहसिलदार श्री धिरज मांजरे यांना देऊन मदत कार्य सुरू केले या वेळी उपजिल्हा रुग्णालय चे वैघकिय अधिक्षक डॉ भाऊसाहेब लहाने स्वःता घटना स्थळी येऊन जखमी ची स्थिती पाहुन लगेच कक्ष सेवक विजय सिरसाट यांना सोबत घेवून उपचार करण्यास सुरवात केली जखमी च्या डाव्या पायाला मोठी जखम होती सदर जखमें मध्ये जंतु तयार झाले होते डॉ लहाने यांचे मार्गदर्शनात कक्ष सेवक विजय सिरसाट यांनी जखम स्वच्छ करुण त्यावर औषधोपचार करुण मलम पट्टी केली यावेळी तहसीलदार मांजरे साहेब यांच्या परवानगीने जखमी च्या नातेवाइकांचा शोध घेवून त्याला त्यांच्या घरी पोहचून देन्यात आले याकरिता नगर परिषद चे राहूल सावंत,सास चे सुमेद बागडे,अमोल लोणकर,दिनेशभाऊ,राजू ढोके,विजय चवरे हे सास सदस्य तर श्रीकांत भाके,मिलीदं त्रिकंडे,यांचे सहकार्य लाभले आले सास च्या मदती च्या हात आभियान मध्ये उपजिल्हारूग्णालया चे वैघकिय अधिक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यांचे विशेष सहकार्य मिळाले ची प्रतिक्रीया सास प्रमुख श्याम सवाई यांनी व्यक्त केली तर रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून आम्ही याकरिता नेहमी कधीही तत्पर आहोत अशी प्रतिक्रिया डॉ भाऊसाहेब लहाने यांनी व्यक्त केली