माजी सैनिक मधुकर राठोड यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही--अमोल लुलेकरवाशिम जिल्ह्या उपाध्यक्ष मनसे

माजी सैनिक मधुकर राठोड यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही--अमोल लुलेकर जिल्ह्या उपाध्यक्ष मनसे


कारंजा:(अमित संगेवार)


  देशसेवेतुन निवृत्त झालेले माजी सैनिक मधुकर गुलाब राठोड़ हे मुळचे आर्नि तालुक्यातील असून श्री राठोड यांनी आरणी येथील शासकीय कर्मचारी करिता राखीव भूखंड पैकी शीट न ७ मधील प्लाट न १२५२ ची १९९७ पासुन मागणी केलीली असून त्यांना आजपर्यंत तो प्लॉट दिला नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे वाशिम जिल्ह्या मनसे ने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे 


     माजी सैनिका करिता राखीव असलेला भूखंड हा काही भूमाफ़ियानी प्रशासनाला हाताशी धरून त्या जागी अवैध बांधकाम केलेले आहे तरी मेहरबान जिल्ह्याधिकारी यवतमाळ यानी लवकरात लवकर योग्य कारवाही करुण माजी सैनीक राठोड यांना न्याय द्यावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे वाशिम मनसे जिल्ह्या उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी म्हटले आहे,यावेळी अनिता चव्हाण,अक्षय राठोड,अजय जाधव,संकेत घाटोले आदिनची उपस्थिति होती