जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधिता सह उपचार घेणारे रुग्ण झालेत ८२५
कारंजा: (संदीप क़ुर्हे)
जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधिता सह उपचार घेणारे रुग्ण संख्या ही ८२५ झाली आहे
प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शिव चौक येथील ५, विनायक नगर येथील १, गणेशनगर येथील १, तिरुपती पार्क परिसरातील ३, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, समर्थ नगर परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शिरपुटी येथील २, शेलगाव येथील २, सोनखास येथील २, देवठाणा येथील २, मालेगाव शहरातील ११, सुकांडा येथील १, रिसोड शहरातील महानंदा नगर येथील १, एकता नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भरजहांगीर येथील १, भोरखेडा येथील १, मांगुळ झनक येथील ४, आंचळ येथील ४, पळसखेडा येथील ४, गणेशपूर येथील १, गोवर्धन येथील २, मंगरुळपीर येथील ४, पारवा येथील १, शेलुबाजार येथील १, पिंप्री अवगण येथील १, कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील १, वाल्मिकी नगर येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या आणखी ४२ रुग्णांना गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळाला आहे. अनसिंग येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या व त्याचदिवशी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३२११
ऍक्टिव्ह – ८२५
डिस्चार्ज – २३२८
मृत्यू – ५७
इतर कारणाने मृत्यू - ०१
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)