कृषी पदवीधर संघटनेच्या वाशिम जिल्ह्या युवती संघटकपदी कु श्वेता धोटकर यांची नियुक्ती.
पुणे:( कारंजा वृत्तकेसरी न्यूज नेटवर्क)
कृषी पदवीधरांच्या भूमिपुत्रांच्या हक्का साठी लढ़ा देणाऱ्या कृषी पदवीधर संघटनेच्या वाशिम जिल्ह्या युवती संघटकपदी कु श्वेता धोटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती ही संस्थापक अध्यक्ष महेश कडुस पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली व सौ. मंगल कडुस पाटील, कोषाध्यक्ष क्रुषी प. सं. कु. भावनाताई गायके, कु. हेमलता ताई फाळके, प्रदेशाध्यक्ष यु. आ. म. रा. यांच्या शिफारशीवरुन तसेच श्री. उदय सुधाकर गर्जे युवक कार्याध्यक्ष वाशिम जिल्हा यांच्या मार्गदर्शना नुसार क्रुषी पदवीधर युवतींचे तसेच क्रुषी संबधित समस्या निराकरणासाठी करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीनंतर क्रुषी पदवीधर युवतींचे प्रश्न सोडविण्यास तसेच संघटन मजबुती साठी प्रयत्नरत राहण्याचे आश्वासन कु. श्वेता धोटकर यांनी केले आहे.