वाशिम जिल्ह्यात आणखी ५६ कोरोना बाधित; ६७ जणांना डिस्चार्ज एकूण रुग्णसंख्या झाली ३७८४ तर उपचार घेणारे रुग्णसंख्या ८४८
कारंजा शहरातील दुसऱ्या टप्प्यातिल रैपिड टेस्ट शिबिरात करण्यात आल्या १२८ तापसन्या
कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि २३
जिल्ह्या प्रशासनाकडून प्राप्त माहिती नुसार वाशिम जिल्ह्यात आणखी ५६ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली असून ६७ जणांना बरे झाल्या मुळे त्याना रुग्णालयातुन सूटी देण्यात आली आहे तर एकूण रुग्णसंख्या ही ३७८४ झाली असून ८४८ रुग्ण उपचार घेत आहेत
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, महात्मा फुले चौक येथील १, आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, चतुर्थ कॉलनी येथील ३, गणेश पेठ येथील ३, अकोला नाका परिसरातील २, नालंदा नगर येथील १, पाटणी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, लक्झरी बसस्थानक परिसरातील १, अनसिंग येथील २, तोंडगाव येथील १, पार्डी आसरा येथील १, कोंडाळा महाली येथील २, ब्रह्मा येथील २, सावंगा येथील १, करंजी येथील १, तामसी येथील १, हिवरा रोहिला येथील २, रिसोड शहरातील शिवाजी रोड परिसरातील १, वाकद येथील १, मोरगव्हाण येथील १, रिठद येथील १, येवती येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, पारवा येथील २, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिक्षक कॉलनी येथील १ व इतर ठिकाणचा १, लोहारा येथील १, मालेगाव शहरातील २, शिरपूर जैन येथील १, घाटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६७ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर आणखी ४ मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. यामध्ये पांगरी नवघरे येथील ७७ वर्षीय महिला, वाशिम शहरातील ६९ वर्षीय पुरुष, मंगरूळपीर येथील ७० वर्षीय महिला व रिसोड शहरातील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३७८४
ऍक्टिव्ह – ८४८
डिस्चार्ज – २८६२
मृत्यू – ७३
इतर कारणाने मृत्यू - १
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)