अमरावती किसान रेल अमरावती वरून सुरू होणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.
अमरावती :(आशीष तांबोळकर)
पश्चिम विदर्भाचा विकासाचा अजेंडा मांडला गडकरींनी आणि तो पाहिला 60,000 लोकांनी.
नितीन गडकरी यांनी आज पश्चिम विदर्भातील जनतेशी फेसबुक लाईव्ह वर केलेल्या संवादाला आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला,कार्यक्रम संपता संपता 1 तासात 60,000 लोकांनी कार्यक्रम बघितला.
अमरावती किसान रेल सुरू करण्याची पश्चिम विदर्भ विकास परिषदेच्या वतीने प्रा.दिनेश सुर्यवंशी यांनी केलेली मागणी ही मागणी अतिशय योग्य असून ही किसान रेल लगेच सुरू होईल व या साठी खाद्य प्रसंस्करण मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या शी आवश्यक असलेले बोलणे पूर्ण झाले असून उद्या नितीनजींनी नागपुरात भुसावळ विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावले आहे.
अमरावती विभागात आता लगेचच हातात येणारे संत्रा पीक या करिता लगेचच अमरावती हुन किसान रेल सुरू होईल व त्यानंतर नियमित किसान रेल सुरू करण्यासाठी शेतकरी, शेतमाल उपलब्धता, व्यापारी संघटना व उपलब्ध भारतीय बाजारपेठ यांची सांगड घालून व वेबसाईट वर या रेलच्या बुकिंग ची व्यवस्था करून ताबडतोब करून नियमित किसान रेल सुरू होईल अशी घोषणा मा.नितीनजी यांनी केली.
पश्चिम विदर्भाच्या विकासात शेतीयोग्य पाण्याची उपलब्धता महत्वाची असल्याने यासाठी पश्चिम विदर्भतील युवक,सामाजिक,राजकीय नेते यांनी ताबडतोब पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्हा हा आपल्या स्वतःच्या अंगभूत गुणांसाठी व विविध वैशिष्ट्य साठी ओळखला जातो.याचा उपयोग पश्चिम विदर्भाच्या विकासा साठी होणे गरजेचे आहे युवकांनी यात पुढाकार घेऊन पारंपरिक शेती बरोबरच बदलत्या काळात पीक पद्धती बदलून इथॅनोल साठी मका पिकवणे आता सुरू केले पाहिजे शेतकऱ्यां द्वारे निर्मित इथेनॉल खरेदीसाठी भारत सरकारने EPA(Ethanol Purchase Agreement) द्वारे याची हमी घेतली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.
यापुढे सहकारी बँकांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देण्याची परवानगी देण्यात आली आहे व कर्ज घेणाऱ्यांना यामध्ये 2 टक्के सबसिडी देण्यात आली आहे याचा भार हा MSME मंत्रालय उचलणार आहे.
विदर्भातल्या संत्रा पिकाला विविध कंपन्यांकडे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचवता येऊ शकते व यातून संत्र्याला उत्तम भाव मिळवून देऊ शकतो यासाठी मा.नितीनजी यांनी अनेक यशस्वी व सकारात्मक प्रयोग केले असून याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.
सीताफळाच्या उत्पादनाला देशभरात प्रचंड मागणी असून ते वाढवण्यासाठी माननीय नितीनजी गडकरी यांनी पुढाकार घेतला असून,मदर डेअरी व विविध आंतराष्ट्रीय बाजारपेठ पर्यंत पोहचण्यासाठी मा.नितीनजी गडकरी स्वतः प्रयत्न करणार असल्याची माननीय नितीनजी गडकरी यांनी सांगितले.
अमरावती मध्ये MSME च Entrepreneurship development centre उभारण्यासाठी अमरावती MIDC मध्ये जागा मिळाली असून या केंद्राला MSME नि मान्यता दिली आहे व यातून संपूर्ण विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी,युवकांसाठी,संशोधकासाठी प्रशिक्षण व संशोधनाचे नवीन दालन उपलब्ध झाले आहे याचा लाभ त्यांनी घ्यावा.
घराच्या विजेवर चालणारे जिनिंग विदर्भातल्या प्रत्येक घरात सुरू होऊ शकतात व युवकांनी मोठ्या प्रमाणत असे प्रकल्प सुरू करावे व अश्या प्रकल्पनां ना MSME मंत्रालय ताबडतोब प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांना लगेच मान्यता देन्यात येईल असेही गडकरी म्हणाले.
विदर्भातील प्रत्येक गावचे मॅपिंग करून,छोट्या गावांचे समूह तयार करून,त्यांचे क्लस्टर तयार करून त्या प्रत्येक क्लस्टर ला एक विशष्ट उत्पादन जोडून त्याची व्याप्ती वाढवणे ही काळाची गरज आहे.यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. या कामात महिला बचत गटांनी पुढाकर घेतल्याने महिलांचे,कुटुंबाचे व देशाचे आर्थिक चित्र बदलेल.
शैक्षणिक संस्थांमधील व विद्यापिठामधील तात्विक /थेअरी ज्ञान पुरेसे नाही त्यासाठी ज्यांनी उद्योगामध्ये ज्यांना यश मिळाले त्याच्या सक्सेस स्टोरीज शिकवल्या जाव्यात यासाठी संपूर्ण विदर्भात 22 इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती सुद्धा नितीनजींनी दिली.
या कार्यक्रमामध्ये अमरावती किसन रेल व पश्चिम विदर्भ विकास परिषदेची रूपरेषा परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व नितीन भुतडा नयांनी मांडली व सूत्र संचालन श्री.आशिष तांबोळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती मीरा फडणीस यांनी केलं.
या कार्यक्रमामध्ये श्यामसुंदर गट्टनी-सीताफळ उत्पादन उद्योजक,कमलेश डागा-उद्योजक,अभिषेक भरड-युवा उद्योजक व अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातील अभ्यास केलेले अभ्यासक,विजय चोरडिया-उद्योजक/बिल्डर,रविकांत तुपकर-स्वाभिमानी शेतकरी संघटनचे प्रदेशाध्यक्ष,विनोद कलंत्री-अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष,सतीश गुप्ता-चिखली अर्बन बँक अध्यक्ष
शरद मैंन्द-अध्यक्ष पुसद अर्बन बँक,अरुण पोबारू अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स यवतमाळ,विजय चोरडिया-उद्योगपती वणी,राजश्री पाटील-अध्यक्ष गोदावरी अर्बन मल्टीस्टेट बँक
अजय मुंदडा-अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक
अनिल अग्रवाल- संपादक अमरावती मंडल,हेमंत काळमेघ-उपाध्यक्ष श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती,विजयराज शिंदे-माजी आमदार बुलढाणा,अमल चवरे-उद्योजक कारंजा लाड यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम विदर्भ विकास परिषदेचे निमंत्रक गजानन कोल्हे , वाशीम जिल्हा निमंत्रक राजू पाटील काळे, वाशिम, अमरावती विभाग उद्योग व शिक्षण संयोजक श्री उत्पल टोंगो ,यवतमाळ जिल्हा महिला संयोजक कीर्ती राऊत, धनंजय पाटील रणखांब , बुलडाणा जिल्हा संयोजक सचिन देशमुख, बुलडाणा जिल्हा प्रदीप सांगळे , मोहन शर्मा मलकापूर, अकोला जिल्हा संयोजक प्रशांत जोशी, अकोला जिल्हा निमंत्रक तथा तेल्हारा च्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख अक्षय जोशी यांनी भरपूर मेहनत घेतली.