धोबी(परिट) समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ठ करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग दिल्ली च्या प्रपत्रा मध्ये महाराष्ट्र शासनाने विहित नमुन्यात माहिती न पाठविल्याने महाराष्ट्र राज्य धोबी(परिट) समाज महासंघ(सर्व भाषीक) कडून जिल्हाभरात निदर्शने
कारंजा:(संदीप क़ुर्हे)
धोबी(परिट) समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ठ करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग दिल्ली च्या प्रपत्रा मध्ये महाराष्ट्र शासनाने विहित नमुन्यात माहिती न पाठविल्याने धोबी(परिट) समाजा तर्फे महाराष्ट्र राज्य धोबी(परिट) समाज महासंघ(सर्व भाषीक) कडून जिल्हाभरात प्रशासनाला निवेदने देवून काळ्या फीती लावून समाजा तर्फे निदर्शने करण्यात आली
महासंघा।ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण भारतभरात धोबी समाज हा राहनिमानाने, व पारंपरिक व्यवसायाने एकच आहे तर महाराष्ट्र निर्मिति पूर्वी हा समाज अनुसुचित जाती मध्ये होता परंतु भाषावार प्रांत रचने नंतर विदर्भातील काही जिल्हे है मध्यप्रदेश मध्ये समाविष्ठ झालेत परिणामी जे बांधव मध्यप्रदेश मध्ये समाविष्ठ झालेत त्यांच्या अनुसुचित जातीच्या सवालती कायम राहल्यात तर महाराष्ट्रातील बांधवाचे सवालती ह्या रद्द झाल्यात ,समाज एकच मात्र याच समाजाला काही ठिकानी सवलतीचा लाभ तर काही ठिकानी सवलतिचा लाभ नाही
दरम्यान मोर्चे ,मेळावे,निवेदने देवून सरकारला धारेवर धरले होते म्हणून सरकारने डॉ भांडे यांच्या अद्यक्षते खाली धोबी समाज पुनरवलोकन समिति गठित केली होती
या समिती ने सुद्धा भारतभरात पसरलेल्या धोबी समाज हा एकच असुन त्याना अनुसूचित जातीत पुन्हा समाविष्ठ करण्याची शिफारस केली होती परिणामी भारत सरकार च्या सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्रा च्या सामाजिक न्याय विभागाला प्रपत्रामध्ये योग्य ती माहिती भरून पाठवन्याचे आदेशित केल होत तरही ह्या विभागाने अद्यापही ही माहिती भरून न पाठविल्या मुळे महाराष्ट्र राज्य धोबी(परिट) समाज महासंघ ने संस्थापक अद्यक्ष्य देवरावजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात काळ्या फीती लावून निदर्शने करीत स्थानिक तहसीलदार यांना निवेदने दिलीत
यावेळी प्रा आनिल मसके,विदर्भ महासचिव,गुलाबराव थुंकेकर ता अद्यक्ष,संतोष ढ़ोंगड़े, जिल्ह्या संघटक,संदीप क़ुर्हे जिल्ह्या उपाध्यक्ष,अजय श्रीवास युवा जिल्ह्या अद्यक्ष्य, राजेश चंदन प्रदेश सद्यस्य, सचिन कोलस्कर,सुरेश तिड़के,गजानन तिड़के,प्रवीण तुपोने,सुनील तिड़के,प्रकाश शहाकार,रामकृष्ण मसके,राजाभाउ कडूकार,माणिक मोखड़कर आदीनची उपस्थिती होती