ओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी


 कारंजा -(संदीप क़ुर्हे)


     सतंतधार पावसाने यावर्षी धोक्याची पातळी ओल्यांडल्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळेच ता.कारंजा (लाड) वंचित बहूजन आघाडीच्या वतिने कारंजा तहसिलदार धिरज मांजरे यांना दि. 23-9-20 रोजी दुपारी 2 वाजता निवेदन सादर करून सविस्तर चर्चा करण्यात आली.


    यावेळी निवेदनात प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यात नापिकी व इतर नैसर्गीक आपत्ती जनावरांचा त्रास व खंडित विद्युत पुरवठा नियमित करणे. यावर्षी अतिवृष्टी मुळे मुंग, उडिद, व सोयाबीन कापुस बोंडे अतिशय सडले व खराब झाली आहे. व बऱ्याच शेतजमीनींना तलावाचे स्वरूप आले अशा स्थितित उभी पिके सडली भुमिपुत्र शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संपुर्ण कारंजा तालुका तात्काळ ओला दुष्काळ म्हणुन जाहीर करण्यात यावा सोयाबीन व कापुस पिकाचे तात्काळ सर्वेक्षण व्हावे व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. ह्या मागाण्या केल्या आहेत. 


    यावेळी निवेदनावर तालुकाध्यक्ष भारत भगत, जि.प.समाज कल्याण सभापती वनिता देवरे, जिल्हा महासचिव सिध्दार्थ देवरे, जिल्हा सचिव राजाभाऊ चव्हाण, पं.स.उपसभापती किशोर ढाकुलकार, पं.स.सदस्य विशाल घोडे, नितिन पाटील, राजुभाऊ अंबरकर, शहराध्यक्ष देवराव कटके, सचिन खांडेकर, शेषराव चव्हाण, सरपंच चंद्रमणी लांजेवार, रवी खडसे, गणेश भगनगरे. यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या निवेदनात आहे.