वाशिम जिल्ह्यात आणखी ७९ कोरोना बाधित तर ३५ कोरोनामुक्त सह एक्टिव संख्या पोहचली ६८० वर
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि ९ सप्टे २०
जिल्ह्यात कोरोना आपली मुळे मजबूत करीत असल्याचे वाढत्या रुग्ण संख्ये वरुण दिसत आहे आज जिल्हाभर ७९ रुग्ण वाढले आहेत.
वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील २, महात्मा फुले चौक परिसरातील ३, गोंदेश्वर परिसरातील १, बस स्टँड मागील परिसरातील १, पोलीस स्टेशनच्या बाजूच्या परिसरातील १, रंगदाळे ले-आऊट परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आनंदवाडी परिसरातील १, शिरपुटी येथील २, बिटोडा येथील १, दुधखेडा येथील १, हिवरा रोहिला येथील १, मानोरा तालुक्यातील उमरी येथील १, धामणी येथील १, उमरी खुर्द येथील २, मालेगाव शहरातील ६, कुराळा येथील १, अनसिंग येथील १, रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसरातील ३, गीताई नगर येथील ३, निजामपुरा येथील १, पिंपळखेडा येथील १, महागाव येथील १, पिंप्री सरहद येथील २, सवड येथील ७, आसेगाव पेन येथील १, केनवड येथील १, मंगरुळपीर शहरातील २, शेलुबाजार येथील २, पेडगाव येथील ९, लाठी येथील ३, चांभई येथील २, चिंचाळा येथील १, कारंजा लाड शहरातील गांधी चौक परिसरातील १, चावरे लाईन परिसरातील ५, राजपुरा परिसरातील २, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
३५ रुग्ण झालेत कोरोनामुक्त
वाशिम शहरातील टिळक चौक परिसरातील ६, हिंगोली नाका परिसरातील १, घुनाणे हॉस्पिटल जवळील २, विठ्ठलवाडी परिसरातील ३, दत्तनगर परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील १, बाळू चौक परिसरातील १, खारोळा येथील ३, दोडकी येथील १, फाळेगाव कोरडे येथील १, मालेगाव शहरातील १, डव्हा येथील ३, शिरपूर जैन येथील १, करंजी येथील १, रिसोड शहरातील सराफा लाईन परिसरातील १, रामकृष्ण नगर परिसरातील १, एसबीआय परिसरातील २, अनंत कॉलनी परिसरातील १, समर्थ नगर परिसरातील १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, करडा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, वांगी (ता. वाशिम) येथील ६५ वर्षीय व्यक्ती व रिसोड शहरातील ब्राह्मणगल्ली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २३७७
ऍक्टिव्ह – ६८०
डिस्चार्ज – १६५१
मृत्यू – ४५ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)