विद्यार्थ्यांनी साधला चक्क लेखिकेशी संवाद ऑनलाइन चा घेतला पूरेपुर आनंदचा घेतला पूरेपुर आनंद
कारंजा:-(प्रतिनिधी)
कामरगांव येथिल जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचेशी गुगलमिटवर संवाद साधत अनेक प्रश्नाची उकल करुन घेतली.
खरं म्हणजे पाठ्यपुस्तकातले धडे आणि आणि विद्यार्थ्यांचा शिकण्यापुरताचं संबंध येतो.त्यातही लेखकाचा संबंध पाठ्यपरिचयात दिला असतो.
तेव्हढाचं काय तो लेखक व विद्यार्थी यांचा संबंध येतो.मात्र मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांचे मार्गदर्शनात वर्गशिक्षक गोपाल खाडे यांनी नियोजन करुन इ.८ वी च्या बालभारतीच्या लिओ नार्दो दा व्हिंची या पाठाच्या लेखिका दीपा देशमुख यांचेशी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा संवाद घडवुन आणला.दीपा देशमुख यांनी छंद आणि मानवी जीवनातले महत्व याविषयी सांगताना त्यांनी त्यांचं बालपण मुलांना सांगितले.त्यातील मजेशिर घटना सांगितल्या.छंद हा माणसाचा श्वास झाला पाहिजे असे त्या म्हणाल्या.छंदाने एकटेपणा दुर पळुन जातो.कोणत्याही छंदात झपाटुन जात आला पाहिजे.छंदाचं रुपांतर व्यवसायात करता येते.छंदात सातत्य असावं परीपुर्णता यावी त्यातुन नैराश्य, एकटेपणा धुडकाउन लावतायेतात. कोविड मध्ये हताश न होता त्याकडे संधी म्हणुन पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आवृत्ती जामनिक, साक्षी घोडे,गौरी निमके,श्रेया सोळंके धनश्री रोटके,तन्मय खाडे या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका नीता तोडकर खाडे यांनी लेखिका दीपा देशमुख यांना प्रश्न विचारलीत व त्याची उत्तरे दीपा देशमुख यांनी दिली.मुलांना ही चर्चा खुप भावली कारण आपण ज्या लेखकांचे पाठ शिकतो त्यांच्याशी बोलता आले.लेखिकेंनी मुलांशी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली.मुख्याध्यापिका अरुणा देशमुख व पर्यवेक्षक गोपाल खाडे यांनी दीपा देशमुख यांचेशी वार्तालाप केला.कार्यक्रमाचे संचलन राज काळे तर आभार अश्विनी सोळसे हिने मानले.