आता जिल्हावासियानीच कोरोना विरोधात आक्रमक होण्याची गरज!
जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधितासह ८३५ रुग्णावर उपचार सुरु
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि १३
जिल्हाप्रशासनाच्या प्राप्त माहिती नुसार
काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात एकूण ८३५ रुग्णावर उपचार सुरु असुन आज पुन्हा ११४ बाधितांची वाढ झाली आहे ज्यामध्ये शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील ३, अकोला नाका परिसरातील २, शुक्रवार पेठ परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील १, पोस्ट ऑफिस परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १,
लाखाळा परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, योजना पार्क परिसरातील १, महात्मा फुले चौक परिसरातील ३, रिसोड नाका परिसरातील २, सिव्हील लाईन्स परिसरातील १, अनसिंग येथील १, घोटा येथील १, सावरगाव जिरे येथील १, गणेशपूर येथील १, शिरपुटी येथील १२, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, गुजरी गल्ली येथील १, सिव्हील लाईन येथील १, बेंदरवाडी येथील १, समर्थनगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, जुनी सराफा लाईन परिसरातील २, ब्राह्मणगल्ली परिसरातील १, आंबेडकर नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, निजामपूर येथील ६, किनखेडा येथील १६, शेलूखडसे येथील १, पळसखेड येथील २, गणेशपूर येथील १, मोरगव्हाण येथील १, सवड येथील १, आसेगाव पेन येथील ५, आंचळ येथील १, केनवड येथील ४, भरजहांगीर येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, मालेगाव शहरातील २२, मुंगळा येथील १, जोडगव्हाण येथील १, अमानी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. आता नागरिकानीच कोव्हीड च्या नियमाची पूरेपुर पालन करीत कोरोना विरोधात आक्रमक होण्याची गरज आहे
आज ३१ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम शहरातील समता नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, शुक्रवार पेठ येथील १, बाहेती गल्ली येथील १, सप्तश्रृंगी नगर येथील २, इनामदारपुरा येथील १, चामुंडादेवी येथील ३, चांडक ले-आऊट परिसरातील २, देवपेठ येथील १, भटउमरा येथील १, सुपखेला येथील १, मोहगव्हाण येथील १, कळंबा महाली येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील २, गुलबावडी येथील १, लोणी फाटा येथील २, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, आसेगाव पेन येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, चिवरा येथील १, कारंजा लाड शहरातील प्रगतीनगर येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात ९ सप्टेंबर रोजी दाखल वाशिम शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ८ सप्टेंबर रोजी दाखल मंगरूळपीर शहरातील ६० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच ९ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व १० सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय महिला व मानोरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २८०४
ऍक्टिव्ह – ८३५
डिस्चार्ज – १९१५
मृत्यू – ५३ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)