पाचवी चा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्यास तूर्तास स्थगिती?

पाचवी चा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्यास तूर्तास स्थगिती?


  औरंगाबाद : (सौ वृत्तसंस्था)


        राज्य शासनाने १६ ऑक्टोबरला पाचवीचा वर्ग इयत्ता पहिलीते चौथीच्या शाळेला जोडण्याचा घेतलेला शासन निर्णय सरकारने तूर्तास मागे घेतलेला आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शुक्रवारी जालना येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या शैक्षणिक आढावा बैठकी दरम्यान दिली.


     नवीन संरचनेनुसार पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होतील, समायोजनाचा नवीन प्रश्न निर्माण होईल. जिल्हा परीषदेच्या अनेक शाळा मोडकळीस आलेला असताना पाचवीचा वर्ग जि.प. शाळांना जोडणे कितपत योग्य? म्हणून हा निर्णय मागे घेण्यासाठी सर्वच स्तरावरुन मागणी होत असल्याचे आ. विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले होते. 


     शासनाने इयत्ता पाचवीचा वर्ग जिल्हा परीषद शाळांना जोडण्याचा आदेश काढला आहे. पंरतू सध्या अनेक जिल्हा परीषदेच्या शाळांना मुबलक खोल्या उपलब्ध नाहीत. ज्या खोल्या आहेत, त्या देखील मोडकळीस आलेल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही. असे असताना चौथीच्या वर्गाला आणखी पाचवीचा वर्ग जिल्हा परीषद शाळांना जोडणे कितपत योग्य आहे? पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांच्या लागणाऱ्या सर्व खोल्यांचे बांधकाम करावे, त्यानंतरच नवीन वर्ग सुरु करण्याबाबत विचार करण्यात यावा. तसेच ज्या गावांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परीषद शाळा आहे, तेथील इयत्ता सहावी व सातवीचा वर्ग त्या गावात सुरु असलेल्या संस्थेच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या शाळांना जोडण्याबाबतचा शासननिर्णय सुद्धा मागे घेणे गरजेचे असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. 


   त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पाचवीचा वर्ग जोडण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आज आम्ही मागे घेत आहोत. तूर्त तो निर्णय स्थगित करून, सर्वांशी चर्चा करून त्यातील इतर सर्व बाबी तपासून पाचवी, सहावी, सातवीचे वर्ग जोडण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगीतले.