यावर्डी येथील शिक्षकांचा संस्था, सरपंच व गांवकऱ्या तर्फे सत्कार
कारंजा :(संदीप क़ुर्हे)
कारंजा-कोरोना महामारीमुळे सर्व शाळा बंद आहे.परंतु शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात खूप समस्या निर्माण होत आहे,या सर्व सामस्यांवर मात करून बाबासाहेब धाबेकर विद्यलय यावर्डी या शाळेत 11 जुलै पासून वर्ग 8,9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांचे नियमित ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.त्याबद्दल शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्था, सरपंच,पोलिस पाटील व गांवकरी मंडळी तर्फे या विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा पल्लवीताई जमाले,उपसरपंच कैलास कापसे,पोलीस पाटील सुनिल ठाकरे,ग्राम कार्लीचे पोलिस पाटील विनोद तायडे, संस्थेचे सहसचिव डी.पी. काळबांडे,अलीमर्दापुरचे प्रतिष्ठीत नागरिक गजानन खोडे,विठ्ठल जमाले,निलेश खोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी ही ग्रामीण भागातील शाळा असून सुद्धा वर्ग 8,9 व 10 च्या सर्व विषयाचे सर्व शिक्षक वेळापत्रका प्रमाणे दररोज 09 तासिका घेतात व इतरही उपक्रम राबवतात म्हणून शिक्षक दिनाचे दिवशी शाळेच्या संस्थेच्या वतीने सहसचिव डी. पी.काळबांडे व निलेश खोपे यांनी मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, कु.शालिनी ओलीवकर,गोपाल काकड,अनिल हजारे आदी शिक्षकांना पेन, डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर ग्रा.पं यावर्डीच्या सरपंचां पल्लवीताई जमाले यांनी सर्व शिक्षकांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच यावर्डीचे उपसरपंच कैलासभाऊ कापसे, पोलिस पाटील सुनिल ठाकरे व कार्लीचे पोलिस पाटील विनोद तायडे यांनी सुद्धा शिक्षकांचा सत्कार केला,त्याचप्रमाणे अलीमर्दापुर येथील प्रतिष्ठित नागरिक गजानन खोडे,यावर्डी येथील विठ्ठल जमाले,कृष्णा ठाकरे, तुफानभाऊ बोनके,मोहन कदम,प्रशांत चव्हाण,अंकुश पाटील,प्रविण बोनके,संदिप मडके,संदिप लबडे
आदी गांवकरी मंडळीनी सत्कार केला.शाळेच्या सर्व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विवेक पोहेकर यांनी केले.