वाशिम जिल्ह्यातिल शहरात कोरोनाचा वाढता आलेख,आज जिल्ह्यात आणखी आढळले ८९ कोरोना बाधित

वाशिम जिल्ह्यातिल शहरात कोरोनाचा वाढता आलेख,आज जिल्ह्यात आणखी आढळले ८९ कोरोना बाधित


नागरिकांनी खबरदारी घेवून धोका ओळखन्याची गरज


कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि १० 


    वाशिम जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच पाय पसरल्याने प्रत्येक तालुक्यात रुग्ण संख्या ही वाढत असल्याचे दिसत आहे ,कोरोनाला रोखान्याकरिता प्रत्येक नागरिकांनी आपली जवाबदारी ओळखून सामाजिक बाँधीलकी जोपासीत प्रशासनला सहकार्य करण्याची खरी गरज आहे त्यामुळे बाहेर निघताना मास्क सामाजिक अंतर पाळने अत्याश्यक आहे 


     काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 


वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील १, पोलीस वसाहत परिसरातील २, चंडिकावेस परिसरातील ८, पोलीस स्टेशन परिसरातील १, पाटील धाबा जवळील २, काळे फाईल परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, सुदर्शन नगर परिसरातील २, महात्मा फुले चौक परिसरातील १, जांभरुण महाली येथील ३, शिरपुटी येथील ६, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर येथील ४, सोनखास येथील १, शेगी येथील १, निंबी येथील १, जनुना येथील १, कासोळा येथील , मोहरी येथील १, गोलवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील १, शांतीनगर येथील २, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १, एम. जे. हायस्कूल परिसरातील १, बाबरे कॉलनी परिसरातील १, वाणीपुरा येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील ८ , रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील २, देशमुख गल्ली परिसरातील १, गुजरी चौक परिसरातील ३, मालेगाव चौक परिसरातील १, गीताई नगर येथील १, सराफा लाईन परिसरातील ४, पंचवटकर गल्ली परिसरातील १, गैबीपुरा येथील १, बेंदरवाडी परिसरातील १, निजामपूर येथील ३, सवड येथील ४, रिठद येथील २, देगाव येथील १, महागाव येथील ४, किनखेडा येथील २, केनवड येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


आजरोजी जिल्ह्यात तालुका निहाय स्थिति


वाशिम २८,मंगरुळपीर ११,कारंजा ९,मानोरा ८,रिसोड ३३


आज ३२ व्यक्तींना डिस्चार्ज


     वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील १, लाखाळा येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, दंडे चौक परिसरातील २, देवपेठ येथील ६, फाळेगाव येथील १, घोटा येथील १, मालेगाव शहरातील २, डव्हा येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील ५, देशमुख गल्ली परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणच्या १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आहे.


  दरम्यान, मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसात आणखी तीन मृत्यूची नोंद झाली आहे.


       कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – २४६९


ऍक्टिव्ह – ७३६ 


डिस्चार्ज – १६८३ 


मृत्यू – ४९ (+१) 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)