शिक्षक दिन ऑनलाइन स्वयंशासन पद्धतीने साजरा. ग्रामिण विद्यार्थांचा डिजिटल उपक्रम

शिक्षक दिन ऑनलाइन स्वयंशासन पद्धतीने साजरा.


ग्रामिण विद्यार्थांचा डिजिटल उपक्रम


कारंजा- (अमित संगेवार)


     कामरगाव येथे जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये शिक्षक दिन हा ऑनलाइन स्वयंमशासन पद्धतीने साजरा करण्यात आला.


    डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजनानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.


शिक्षकांनी विद्यार्थ्यांला विविध विषयांचे वाटप करून त्या संदर्भातला अध्यापन ऑनलाईन पद्धतीने करण्यास सांगितले.


मुख्याध्यापिका अरुणा देशमुख व पर्यवेक्षक दिलिप सावळे,गोपाल खाडे व प्रा.राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षकांनी यात आपला सहभाग नोंदवला.वसंतराव चव्हाण,संजीवनी सोळंके,प्रेमलता पारवे,नीता तोडकर, भूमिका भाकरे,पुष्पा व्यवहारे, दीपाली खोडके सतीष चव्हाण,गोपाल खाडे,धनंजय घुले,विकास रुईकर, रुपाली लोखंडे, हेमलता मोतुळे, गोविंद भोंडणे,प्रा.शिल्पा राठोड,नम्रता पाटिल, धनंजय वैद्य,संदिप निखाते,आनंद शिंदे व दुर्गा भामकर शिक्षकांनी उत्तम नियोजन केले.प्रत्येक वर्गातील चार विद्यार्थ्यांनी अॉनलाईन स्वयंशासनात विविध विषयाचे अध्यापन केले.शिक्षक बनलेल्या व विद्यार्थ्यांनी अॉनलाइन स्वयंशासनाबद्दल आनंद व्यक्त केला.बर्‍याच मुलांच्या अध्यापनात त्यांच्या शिक्षकांची झलक दिसत होती.एकीकडे शाळा बंद आहे मात्र कामरगांव जि.प.विद्यालयाच्याया उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.