अर्थसारथी संघटने तर्फे गुणवंताचा सत्कार....
लेखाधिकारी कार्यालय वाशिम,विविध संघटनेचा पुढाकार
कारंजा (तालुका प्रतिनिधी)
अर्थसारथी अर्थात महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा राजपत्रित अधिकारी संघटना,मुंबई च्या वतीने कारंजा तालुक्यातील इयत्ता दहावी तथा बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम आलेल्या गुणवंताचा सत्कार सोहळा जे. सी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये १० सप्टेंबरला संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य उदय नांदगांवकर यांनी भूषविले,विशेष अतिथी म्हणून कारंजा तालुका मुख्याद्या्पक संघाचे तालुका अध्यक्ष पंजाबराव नायक तर प्रमुख अतिथी म्हणून आर.जे.चवरे प्राथ.व माध्य. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चोपडे व जे.सी हायस्कूलचे पर्यवेक्षक भारत हरसुले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात तालुक्यातून इयत्ता १० वी तून प्रथम आलेली कु.रेवती विजय गायकवाड, जे.सी हायस्कूल कारंजा,तर इयत्ता १२वी विज्ञान शाखेतून प्रथम आलेला मयूर नितीन वैद्य जे.सी हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,कारंजा तथा वाणिज्य शाखेत प्रथम आलला सागर महादेव कोकाटे,विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, कारंजा व स्व.डॉ.सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालय कुपटी येथील कला शाखेत तालुक्यातून प्रथम आलेली कु.वैष्णवी शिवदास चौधरी यांना पुष्पगुच्छ,प्रशस्तीपत्र व पुस्तिका तर प्राचार्य उदय नांदगावकर , प्राचार्य डॉ. पी.आर.राजपूत व मुख्याध्यापक प्रविण सोनिवाल यांना पुष्पगुच्छ,चांदीचे मेडल व प्रमाणपत्र देऊन उपस्थित विविध संघटनाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक बी.एन. काळपांडे लेखाधिकारी वाशिम यांचे सर्वच गुणवंतानी कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी कु.रेवती व मयूर या गुणवंतानी मनोगत व्यक्त केले तसेच गुणवंत प्राचार्य यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना अर्थसारथी संघटना व लेखाधिकारी कार्यालयाचे आभार मानले.अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारंजा मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव विजय भड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष धीरज उजवणे यांनी केले.यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे तालुका अध्यक्ष पी.व्ही.म्हातारमारे,
मुख्याध्यापक सतीश गायधनी, प्रयोगशाळा सहायक/परिचर संघटनेचे विवेक देवलसी तसेच गुणवंताचे पालक उपस्थित होते.