वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच
जिल्ह्यात आणखी वाढले ८१ कोरोना बाधित तर ८४ रुग्णाची कोरोनावर मात
कारंजा:(संदीप क़ुर्हे)
वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड,मालेगाव येथे कोरोनाचे थैमान रुग्ण संख्ये वरुन सुरुच असल्याचे दिसत आहे कारंजा ला मात्र काही प्रमाणात दिलासा असल्याचे दिसत आहे
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ३, पाटील धाब्यामागील १, शिव चौक परिसरातील १, जुने पोलीस वसाहत परिसरातील १, विनायक नगर परिसरातील १, नवीन आययुडीपी परिसरातील १, नालंदा नगर परिसरातील १, गणेशपेठ परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, चंडिकावेश परिसरातील १, स्वराज कॉलनी परिसरातील १, लाखाळा येथील १, जिल्हा कारागृह परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणची १, पंचशील नगर परिसरातील १, सौदागरपुरा येथील १, दंडे चौक परिसरातील ८, झाकलवाडी येथील १, वांगी येथील ५, कळंबा महाली येथील २, जांभरूण महाली येथील १, काजळंबा येथील ५, घोटा येथील १, खारोळा येथील १, मालेगाव शहरातील २, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील १, एकता नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील ४, अनंत कॉलनी परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, कासारगल्ली येथील ८, बेंदरवाडी येथील २, गुलबावडी येथील १, लोणी फाटा येथील २, देगाव येथील १, हिवरा पेन येथील ३, किनखेडा येथील १, महागाव येथील ३, रिठद येथील ३, मांगुळझनक येथील १, मंगरूळपीर शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पस्ट झाले आहे.
रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्येत सुद्धा होत आहे वाढ आज ८४ रुग्णाची कोरोनावर मात
वाशिम शहरातील शुक्रवार पेठ परीसारतील १, पोस्ट ऑफिस जवळील ३, सुभाष चौक परिसरातील २, टिळक चौक परिसरातील २, निमजगा येथील ४, गुरुवार बाजार परिसरातील २, सिव्हील लाईन्स परिसरातील १, रिसोड शहरातील २, किनखेडा येथील २०, येवती येथील १२, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील ३, कोठारी येथील १, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील ४, नागी येथील १, कवठळ येथील १, जनुना येथील १, मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, करंजी येथील १, कारंजा लाड शहरातील मानक नगर येथील २, कुंभारपुरा येथील ३, अकोला अर्बन बँक जवळील १, गौतम नगर येथील २, सराफा लाईन परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव येथील ४, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, उमरी येथील २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाढती रुग्ण संख्या जरी असली तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मात्र कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहे
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – २२४४
ऍक्टिव्ह – ६१३
डिस्चार्ज – १५८९
मृत्यू – ४१ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)