कारंजा लाड मध्ये वैदर्भीय नाथ समाज संघाची आरक्षणासंबंधी बैठक संपन्न. शासनाला मागणार आरक्षणाची भिक्षा

  कारंजा लाड मध्ये वैदर्भीय नाथ समाज संघाची आरक्षणासंबंधी बैठक संपन्न.


    शासनाला मागणार आरक्षणाची भिक्षा


कारंजा : ( संदीप क़ुर्हे ) दि२८


      नाथ समाजाच्या विविध समस्या, अडचणी, समाजाला शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधा लाभ समाजाला न होणे, समाजावर होणारा अन्याय, वारंवार समाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वैदर्भीय नाथ समाज संघा तर्फे आज कारंजा लाड येथे पदाधिकाऱ्याची बैठक घेण्यात आली..


या बैठकीत वरील विषयांवर चर्चा करण्यात आली.या सर्व मुद्यांपैकी आरक्षणाच्या मुद्यावर जरा जास्त भर देण्यात आला,कारण की नाथ समाजाला कुठल्याही प्रकारचा परंपरागत व्यवसाय नाही परंतु शासन परंपरागत व्यवसाय असलेल्या इतर समाजाला जर भरीव आरक्षण देत असेल तर हा भटक्या नाथपंथीय समाजावर फार मोठा अन्याय आहे त्यामुळेच नाथ समाजाला (st) प्रवर्गात घेण्यात यावं यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे एकमताने ठरविण्यात आले.


    याच मुद्यांच्या पार्श्वभूमीवर नाथ समाजाच्या इतिसासात कधीही न झालेलं अस भीक्षा मागो आंदोलन वैदर्भीय नाथ समाज संघा तर्फे विदर्भातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.


     या व अश्या अन्य मुद्यांवर चर्चा करत आंदोलनाची रूपरेषा आजच्या बैठकीत ठरवण्यात आली.


    आजच्या बैठकीत वैदर्भीय नाथ समाज संघाचे माननीय संस्थापक अध्यक्ष श्री.एकनाथजी पवार,विनोदनाथजी खंडाळेकर, दिवाकरनाथजी गौरकर, आकाशनाथजी वाडेकर, अभिषेकनाथजी पाठक,अश्वीननाथजी चव्हाण,शुभमनाथजी वाडेकर, शरदनाथजी पवार, उमेशनाथजी चिलवंते, नितिननाथजी चिलवंते,नितीननाथजी अखतकर,निलेशनाथजी वाघमारे,विनोदनाथजी चव्हाण, प्रशांतनाथजी उबाळे, नागेशनाथजी जाधव, महेंद्रनाथजी ठाकरे, विजयनाथजी जवंजाळ, रवींद्रनाथजी खंडाळेकर, प्रविणनाथजी शिखरे,सुनीलनाथजी बायस्कार, सुशिलनाथजी ठाकरे,दिपकनाथजी ठाकरे, संतोषनाथजी सातपुते, इंगळे, संतोषनाथजी ब्रम्हकुळे, तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.