कारंजा उपजिल्हारुग्णालय कडून तालुक्यातील नागरिकांना जाहिर आवाहन उपजिल्हारुग्णालयातील सामान्य आरोग्य तपासणी नियमितपने सुरुच असल्याचे नागरिकांना आवाहन

कारंजा उपजिल्हारुग्णालय कडून तालुक्यातील नागरिकांना जाहिर आवाहन


उपजिल्हारुग्णालयातील सामान्य आरोग्य तपासणी नियमितपने सुरुच असल्याचे रुगनालाय प्रशासना चे नागरिकांना आवाहन


   कारंजा :(संदीप क़ुर्हे) 


    सद्या सर्वत्र कोरोनाचे च्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागात या गंभीर आजारा बाबत चर्चा सुरु आहे तसेच बऱ्याच प्रमाणात गैर समज पसरल्याचे जाणवत आहे विशेष करुण उपजिल्हारुग्णात असलेल्या कोव्हीड सेंटर मुळे नागरिकांच्या च्या मनात गैरसमज पसरत असल्याने कारंजा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने तर्फे डॉ बाळासाहेब लहाने यानी तर महसूल प्रशासना तर्फे तहसीलदार धीरज मांजरे यांनी नागरिकांना आवाहन केले की,


      उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णाची ईमारत ही स्वतंत्र असून नागरिकांनी मनात कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता रुग्णालयात तपासणी करिता यावे,


    स्त्री रोग विभाग,बालरोग विभाग,व जनरल सर्जन बाह्यरुग्न विभागात हे रोज सकाळी ९ ते १२ वेळेत नियमीत उपस्थित राहणार आहेत ,


      गरोदर मातांची तपासणी ही दर मंगळवार व शुक्रवार ला स्त्री रोग विभागात सकाळी ९ ते १२ दरम्यान केली जाणार आहे ,


    दर शनिवार ला बालरुग्णाला सकाळी ९ ते १२ वेळेत लसिकरण केले जाणार आहे


     तरी नागरिकांनी मनात कोणतीही भिती न ठेवता आवशक्यता भासल्यास आपली आरोग्य तपासणी करण्याकरिता उपजिल्हारुग्णालयात यावे असे आवाहन डॉ भाऊसाहेब लहाने व तहसीलदार धीरज मांजरे यानी केले आहे