जिल्ह्यावर कोरोना वाढते संकट कायम!
जिल्ह्यात आणखी १५० कोरोना बाधित; ९८ जणांना डिस्चार्ज
कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि २०
जिल्ह्यावरिल कोरोना चे संकट काही कमी होताना दिसत नाही कारण काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात १५० बाधितांची नोंद झाली असून ९८ कोरोनामुक्त झाले आहेत ज्यामध्ये वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, लाखाळा परिसरातील ११, शुक्रवार पेठ येथील ६, सुभाष चौक येथील १, बाहेती गल्ली येथील १, स्त्री रुग्णालय परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील १, गोंदेश्वर येथील १, माधव नगर येथील २, नंदिपेठ येथील ११, ध्रुव चौक येथील २, जुनी आययुडीपी येथील १, लोनसुने चौक येथील १, काटीवेस येथील ३, सिव्हील लाईन्स येथील ३, चामुंडादेवी परिसरातील ३, वाटाणे वाडी येथील १, आनंदवाडी येथील १, विनायक नगर येथील १, पाटणी चौक परिसरातील १, काळे फाईल येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, बाभुळगाव येथील १, सोयता येथील १, उमरा शमशुद्दीन येथील ४, अनसिंग येथील २, केकतउमरा येथील १५, सेनगाव येथील १, जांभरूण जहांगीर येथील १२, तामसी येथील ५, आसोला येथील १, मोहगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील महसूल कॉलनी येथील २, शिक्षक कॉलनी येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, एरंडा येथील १, अमानी येथील २, डव्हा येथील १, पिंप्री सरहद येथील २, झोडगा येथील २, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, सराफा लाईन येथील २, शासकीय रुग्णालय परिसरातील ४, अनंत कॉलनी परिसरातील १, पॉवर हाऊस परिसरातील १, लोणी फाटा येथील २, गणेशपूर येथील ४, चिचांबा पेन येथील २, नेतान्सा येथील १, मांगुळ झनक येथील १, हिवरा पेन येथील २, नंधाना येथील १, केनवड येथील १, रिठद येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, हिवराळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, शिवणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, आज ९८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसात जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाशिम शहरातील चामुंडादेवी परिसरातील ४५ वर्षीय महिला, ब्रह्मा येथील ६९ वर्षीय पुरुष, शिरपुटी येथील ५५ वर्षीय महिला, रिठद (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिला, सोनखास (ता. मंगरूळपीर), येथील ६७ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील ८५ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३५५५
ऍक्टिव्ह – ८७२
डिस्चार्ज – २६१९
मृत्यू – ६३
इतर कारणाने मृत्यू - १
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)