जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या वाढत्या प्रमाणात जिल्ह्यात आज आढळले १५० कोरोना बाधित; ११७ जणांना डिस्चार्ज कारंजा शहरात रैपिड टेस्ट शिबिराला वाढता प्रतिसाद

जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या वाढत्या प्रमाणात


जिल्ह्यात आज आढळले १५० कोरोना बाधित; ११७ जणांना डिस्चार्ज


     कारंजा शहरात रैपिड टेस्ट शिबिराला वाढता प्रतिसाद 


कारंजा(संदीप क़ुर्हे) दि १९


   जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या ही वाढत्या प्रमाणात असताना दिसत असून जिल्ह्यात आज १५० कोरोना बाधित आढळले असल्याची नोंद झाली असून ११७ जणांना डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती जिल्ह्या प्रशासना दिली आहे


      प्रशासनाने सर्व व्यापारी व दुकानातील कर्मचारी यांची कोव्हीड टेस्ट बंधनकारक केली असल्याने कारंजा शहरात ५ दिवशीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या रैपिड टेस्ट शिबिराच्या ३ ऱ्या दिवशी १२४ टेस्ट,तुळजा भवानी सेंटर ४८,तर उपजिल्हा रुग्णालय येथे ७६ टेस्ट अशा एकूण २४८ तपासणी करण्यात आल्याची माहिती प्राप्त आहे


      काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील महात्मा फुले चौक येथील १, विद्यानिकेतन स्कूल समोरील १, आययुडीपी कॉलनी येथील १, विनायक नगर येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील २, जैन मंदिर परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, दत्तनगर येथील ३, नंदीपेठ येथील १, पाटणी चौक येथील ३, नगरपरिषद परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, चतुर्थ कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, सोनखास येथील २, बोरखेडी येथील १, हिवरा येथील १, ब्रह्मा येथील २, जांभरूण जहांगीर येथील ३, टो येथील १, फाळेगाव कोरडे येथील १, हिवरा लाहे येथील १, अनसिंग येथील ४, शिरपुटी येथील ४, मानोरा शहरातील २, वाईगौळ येथील १, कुपटा येथील १, दापुरा येथील ३, मालेगाव शहरातील ९, पांगरी कुटे येथील १, शिरपूर येथील ६, पांगरी नवघरे येथील २, शिरसाळा येथील १, रिसोड शहरातील समर्थ नगर येथील ३, साई नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १३, बेंदरवाडी येथील १, लोणी फाटा येथील १, देऊळगाव बंडा येथील १, नेतन्सा येथील १, निजामपूर येथील ३, मसला पेन येथील १, गणेशपूर येथील ५, सवड येथील १, येवती येथील १, केनवड येथील ४, शेलगाव येथील १, कोयाळी खुर्द येथील ३, कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील ३, टेलिकॉम कॉलनी परिसरातील २, कांचन विहार परिसरातील १, अशोक नगर येथील ५, पंचशील नगर येथील १, जयस्तंभ चौक येथील १, डाफनीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मंगरूळपीर शहरातील १०, जोगलदरी येथील १, जांब येथील १, माळशेलू येथील १, मोझरी येथील १, शेलगाव येथील २, आसेगाव येथील १, नांदखेडा येथील १, पिंप्री अवगण येथील १, पेडगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ११७ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


      कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ३४०४


ऍक्टिव्ह – ८२५


डिस्चार्ज – २५२१


मृत्यू – ५७


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)