*ग्रामीण व शहरी भागात चालू असलेले अवैध धंदे बंद कारावेत ; अन्यथा आंदोलन :- महेशदादा राऊत, प्रहार सेवक , प्रहार जनशक्ती पक्ष*

 ग्रामीण व शहरी भागात चालू असलेले अवैध धंदे बंद कारावेत ; अन्यथा आंदोलन :- महेश राऊत, प्रहार सेवक , प्रहार जनशक्ती पक्ष


कारंजा :(संदीप क़ुर्हे)


  -तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात वरली मटका,गावठी दारू,गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक, खुलेआम चालू आहे . हे अवैध धंदे ताबडतोब बंद करण्यात यावे .अशी मागणी महेश राऊत,प्रहार सेवक,प्रहार जनशक्ती पक्ष ,कारंजा यांनी पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्याकडे दि.12/09/2020 रोजी निवेदनाद्वारे केली असून हे सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे,निवेदनात नमूद करण्यात आले की या अवैध धंद्यामुळे आदीच अडचणीत असलेला शेतकरी व्यसनाधीन होत चाललेला आहे व काही ठिकाणचे आलेले पैसे तो या अवैध धंद्यात गमावतो यामुळे तो निराश होऊन त्याचे कौटुंबीक वातावरण बीघडत असून त्यांचा कुटुंबात भांडणे होत आहे .कोरोना सारखे माहामारीचे संकट पूर्ण देशावर असून या धंद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन न पाळून कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि वरली मटक्याच्या दुकानात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे .याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ,स्थनिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे हे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे , अवैध धंदे 7 दिवसाच्या आत बंद न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे व त्याच्या परिणामाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे.


  अशे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महेश राऊत यांनी कळविले आहे,