स्वतःचे व्यक्तिमत्व ओळखून करीयर निवडा-प्रा. निर्मलसिंह ठाकुर
कारंजा (तालुका प्रतिनिधी)
स्थानिक जे. डी. चवरे विद्यामंदीर शाळेतील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करीयर नियोजन कसे करावे? या विषयावरील ऑनलाइन व्याख्यान दिनांक 15 सप्टेंबर रोजी झुम अँपच्या माध्यमातून प्राचार्य उदय दर्यापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये नरसी मोनजी विद्यापीठ, मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक, करीयर मार्गदर्शक तथा आदीशक्ती महिला बहुउद्देशिय संस्थेचे संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अंधानुकरण न करता, स्वतःचे अंतर्गत गुण, कौशल्ये तसेच व्यक्तिमत्व ओळखून करीयर निवडणे आवश्यक आहे. यांञिकीकरनाच्या आजच्या युगात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहीजे असे यावेळी बोलताना प्रा. ठाकुर म्हणाले.
आपल्या संभाषणामध्ये प्रा. ठाकुर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील नाविन्यपुर्ण करीयर संधी बद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली तसेच त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिलीत.
कार्यक्रमाचे सुञ संचालन तथा आभार प्रदर्शन जे. डी. चवरे विद्यामंदीर शाळेचे शिक्षक महेन्द्र धनस्कर यांनी केले. या ऑनलाइन व्याख्यानाकरीता वर्ग 10 वीचे विद्यार्थी , त्यांचे पालक तथा शिक्षक ऊपस्थीत होते.