वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ११९ कोरोना बाधित ७२ जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात घेत आहेत ७२१ रुग्ण उपचार
कारंजा: ( संदीप क़ुर्हे )दि २९
जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक हा सुरुच असल्याचे दिसत आहे कारण काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशासना च्या प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, नारायण बाबा चौक येथील १, योजना पार्क येथील १, पाटणी चौक येथील १, सिव्हील लाईन येथील २, पोलीस वसाहत परिसरातील २, सुंदरवाटिका येथील १, समर्थ नगर येथील १, लाखाळा येथील १, सुदर्शन नगर येथील १, गणेश नगर येथील १, कोल्हटकरवाडी परिसरातील १, पोलीस स्टेशन मागील परिसरातील १, काळे फाईल येथील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, सीताराम नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, मोठा उमरा येथील १, तामसी येथील ८, अडोळी येथील २, काटा येथील २, कार्ली येथील २, ब्रह्मा येथील १, शेलगाव येथील १, देपूळ येथील १, भटउमरा येथील १, केकतउमरा येथील १, अनसिंग येथील १, गणेशपूर येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, गजानन नगर येथील १, आसनगल्ली येथील १, एकता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, गोवर्धन येथील १, धोडप येथील १, चिचांबाभर येथील १, करडा येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कार्ली येथील १, शेंदूरजना येथील १, मालेगाव शहरातील ५, तरोडी येथील २, जऊळका येथील १, मारसूळ येथील १, रेगाव येथील १, शिरपूर जैन येथील १, मंगरूळपीर शहरातील ८, शेलूबाजार येथील १,
मुर्तीजापुर येथील १, वनोजा येथील १०, जनुना येथील १, वार्डा येथील २, पाळोदी येथील २, गोलवाडी येथील १, मोझरी येथील १, चिंचखेडा येथील २, पिंपळखुटा येथील २, नागी येथील १, पिंप्री येथील १, सर्सी येथील २, कारंजा लाड शहरातील वानखेडे हॉस्पिटल परिसरातील २, शिक्षक कॉलनी येथील २, व्यास नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव येथील ४, खेर्डा येथील ३, व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७२ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या वाशिम तालुक्यातील १ व मंगरूळपीर तालुक्यातील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४२९५
ऍक्टिव्ह – ७२१
डिस्चार्ज – ३४८६
मृत्यू – ८७
इतर कारणाने मृत्यू - १
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)