नागरिकांनी मास्क फॅशन म्हणून वापरु नये,तर गरज म्हणून वापरावे---डॉ भाऊसाहेब लहाने, वैद्यकीय अधिक्षक ,उपजिल्हा रुग्णालय कारंजा

नागरिकांनी मास्क फॅशन म्हणून वापरु नये,तर गरज म्हणून वापरावे---डॉ भाऊसाहेब लहाने वैद्यकीय अधिक्षक ,उपजिल्हा रुग्णालय कारंजा


कारंजा::( संदीप क़ुर्हे) दि १७


      राज्यासह जिल्ह्यात कोरोना डोके चांगलेच वर काढले आहेत सध्या राज्यसरकारने अनलॉक -४ ची प्रभावी अंमलबजावणी सुरु केलीली आहे जवळपास सर्वच व्यापार ,उद्योग जिल्हा बंदी उठवली राज्यासह पर राज्यात सुद्धा प्रवासी वाहतुकीच्या साधनाना परवानगी दिलेली आहे शिवाय बस वाहतूक ला आता काही अटी सह पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची राज्य सरकार ने घोषणा केली आहे 


 जिल्ह्या भरात आता कोरोना रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढतच आहे बऱ्याच ठिकानी नागरिक शोसल डिस्टनसिंग चे पालन करायला तयार नसल्याचे लक्ष्यात येत आहे तोंडाला मास्क सुद्धा बांधित नसल्याचे चित्र आहे परिणामी संसर्ग हा वाढता दिसत आहे काही नागरिक हे मास्क हे गरज म्हणून नाही तर फॅशन म्हणून वापरतना दिसत आहे या सर्वासमोर प्रशासना सुद्धा हतबल झाल्याचे दिसत आहे 


    मास्क बाबत कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने म्हणतात की आजकाल नागरिक कोरोना ला बिल्कुल घबरताना दिसत नाहीत कारण शोसल डिस्टनसिंग पालन त नसताना दिसत आहे मास्क हे गरज समजून न वापरता फैशन समजून वापरला जात आहे मास्क है सरळ तोड़, नाक व( डोळे सोडून) व इतर चेहरा पूर्ण झाकला जावा असा वापरला गेला पाहिजे,तोंडाला बार बार हात लावू नये, नाक व तोंडावरिल मास्क कानाला हैंगर सारखे लटकवू नये, कपाळावर लावू नये,नेहमी मास्क ला हात लावू नये, नेकरुन आजार वाढेल असे करू नये  


खालील दाखविल्या प्रमाणे मुळीच करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.