नितीनजी गडकरी आज किसान रेल,आत्मनिर्भर भारत,संदर्भात पश्चिम विदर्भातील नागरिकांशी फेसबुक लाइव संवाद साधणार.

आज ११ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पश्चिम विदर्भातील जनते शी किसान रेल,आत्मनिर्भर भारत,सूक्ष्म लघु तथा मध्यम उद्योगांसंबंधी साधनार संवाद


कारंजा:(संदीप क़ुर्हे)


    लोकमान्य टिळकांच्या निधनाला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्याने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे फेसबुक लाईव्ह,पश्चिम विदर्भाचा विकास साधणाऱ्या अमरावती किसान रेल व या अमरावती किसान रेल चा उपयोग आत्मनिर्भर भारत, सूक्ष्म लघु तथा मध्यम उद्योग उभारण्यात कसा करावा मा.नितीनजी गडकरी पश्चिम विदर्भातील नागरिकांशी संवाद साधणार.


     लोकमान्य टिळकांच्या निधनाला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. ११ सप्टेंबर १८९३ ला स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भारतीय तत्वज्ञान जगा समोर मांडणारे दिग्विजयी भाषण केले. आणि येत्या २५ सप्टेंबर ला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे या त्रिवेणी मुहूर्तावर माननीय नितीनजी गडकरी यांचे शताब्दी व्याख्यान मालेतील पाहिले उदघाटन मार्गदर्शन व संवाद आयोजित होत आहे.


 


अमरावती येथून सुरू करावयाच्या किसान रेल व त्या संदर्भातील आत्मनिर्भर भारत तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उद्या ११ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांचे फेसबुक लाईव्ह हे नितीनजी गडकरी यांच्या फेसबुक पेज वरून थेट प्रक्षेपण प्रसारित केले जाणार आहे. 


   अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार महिला बचत गट उदयोग, व्यापार घटक यांना आर्थिक उत्पन्न वाढण्यास संदर्भात हे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. देशभरातील विविध ठिकाणा साठी जेंव्हा ही किसान रेल्वे ही सुरू होईल तेंव्हा तिचा उपयोग शेतकऱ्यां नी उत्पादित केलेला शेतमाल कमी वेळात भारताच्या चार ही कोपऱ्यातील विविध बाजार बाजारपेठेत योग्य वेळेत पोहचण्यासाठी ह्या किसान रेलचा महत्वपूर्ण वाटा राहणार आहे.


  किसान रेल्वे सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल व हे वाढलेले उत्पादन किसान रेलच्या माध्यमातून देशभरात पोहचवल्या जाऊ शकेल ह्यामुळे रोजगार तथा इतर विविध संधी मोठ्या प्रमाणात तयार होईल आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे.


    अमरावतीसह विभागातील अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या जिल्ह्यातील संत्रे,केळी , दूध, मासे, भाजीपाला रानभाज्या सहित जास्त आद्रता असलेली चना, सोयाबीन सारखी पिके भारताच्या चारही कानाकोपऱ्यात मध्ये खराब होण्यापूर्वी पोहोचविण्याचे काम किसान रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, पाच जिल्ह्यातील आर्थिक स्थिती कशी सुधारेल, कोणत्या रोजगार निर्मिती उपलब्ध होऊ शकतील होईल , सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांची संकल्पना या फेसबुक लाईव्ह प्रक्षेपणातून जनतेला ऐकण्याची संधी मिळणार आहे.


     किसान रेलच्या मागणीला पश्चिम विदर्भातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हि रेल्वे सुरु झाल्याने विकासाची एक नवी नांदी ह्या भागात येणार आहे,बरोबरीने आमनिर्भर भारत ह्या अभियानाचे महत्व त्याने उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी तथा तरुण उद्योजकांना सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग या संदर्भात असणाऱ्या विविध उपलब्धी ह्या सर्व गोष्टींसाठी मा.नितीनजी गडकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.    


   केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे थेट प्रक्षेपण लाईव्ह फेसबुकवर "नितीन गडकरी" ह्या पेजवर


https://www.facebook.com/nitingadkary/


 


यु ट्यूब चॅनेल


https://www.youtube.com/c/NitinGadkariOfficial


 


Twitter


@nitin_gadkari 


 


लिंक क्लिक करू बघता येईल.


     आपल्या भागाच्या विकासाठी शेतकरी, शेतमजूर , महिला, महिला बचत गट, उद्योजक, व्यापारी, युवक, शिक्षक, प्राचार्य, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी नितीनजींच्या या संवाद सभेचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम विदर्भ विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, संयोजक नितीन भुतडा, निमंत्रक गजानन कोल्हे ,वाशीम जिल्हा संयोजक आशिष तांबोळकर, वाशीम जिल्हा निमंत्रक डॉ राजू पाटील काळे, दिलीपजी जोशी,संदिप गढवाले, धनंजय रनखांब , ललित तिवारी, संदिप कुर्हे, अमित संगेवार, प्रमोद देसाई,बाबा उसरेटे, यांनी केले आहे.