वाशिम जिल्ह्यात आणखी ७८ कोरोना बाधित , ७० जणांना डिस्चार्ज तर ८५९ रुग्णावर उपचार सुरू

वाशिम जिल्ह्यात आणखी ७८ कोरोना बाधित , ७० जणांना डिस्चार्ज तर ८५९ रुग्णावर उपचार सुरु


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २२


   जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील १, मालेगाव शहरातील ३, रिसोड तालुक्यातील कोयाळी येथील ५, चिचांबाभर येथील ५, येवती येथील १, मानोरा शहरातील ५, वाईगौळ येथील ३, हातोली येथील १, मंगरूळपीर शहरातील ६, पारवा येथील ३, तपोवन येथील २, शेलूबाजार येथील १, उमरी येथील १, वनोजा येथील ९, मोझरी येथील १, चिंचाळा येथील ३, मोहरी येथील १, कारंजा लाड शहरातील वाल्मिकी नगर येथील २, तुषार कॉलनी येथील ३, ममता नगर येथील ४, गौतम नगर येथील ४, साईनगर येथील १, आंबेडकर चौक परिसरातील १, मंगरूळवेस परिसरातील १, इंदिरानगर परिसरातील १, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील २, धामणी खडी येथील १, बेंबळा येथील ३, गिर्डा येथील १, तपोवन येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


     दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७० व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्याबाहेर आणखी २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये रिसोड शहरातील १ व शेलूबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


       कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ३७२४


ऍक्टिव्ह – ८५९


डिस्चार्ज – २७९५


मृत्यू – ६९


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाधितांची आहे.)