दुकाने व अस्थापने उघडण्याच्या वेळेवर कोणतेही बंधने नाहीत--जिल्हाप्रशासन

दुकाने व अस्थापने उघडण्याच्या वेळेवर कोणतेही बंधने नाहीत--जिल्हाप्रशासन


कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि ३ सप्टे २०


     जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून २ सप्टेंबरपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली असून जिल्ह्यातील परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सांयकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. 


      परंतु परिपत्रकात दुकाने व अस्थापने सुरु ठेवन्याच्या वेळेत संध्या 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा असताना 


  दुकाने उघड़ने ची वेळ स्पस्ट नसल्याने दुकाने किती वाजता उघडावी याबाबत व्यापारी वर्गा मध्ये संभ्रम निर्माण झाला होता 


 परंतु हा संभ्रम आता स्वता जिल्हाधिकारी श्री ऋषिकेशजी मोडक यांनी दुर केला आहे 


  दुकाने उघडण्याच्या वेळेबाबत कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, व्यापारी आपल्या सोइने दुकाने उघडू शकतील असेही त्यांनी म्हटले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.