वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ४३८१ बाधीत तर ३५७४ कोरोनामुक्त, मृत्यु संख्या ९१
जिल्ह्यात आजआणखी ८५ कोरोना बाधित; ८८ जणांना डिस्चार्ज
कारंजा (संदीप क़ुर्हे) दि ३०
वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ४३८१ बाधीतांची नोंद झाली असून ३५७४ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत मृत्यु संख्या ९१ असून ७१५ रुग्ण उपचार घेत आहेत
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील देवपेठ येथील ४, राजनी चौक येथील १, लाखाळा येथील १, पाटणी चौक येथील २, सिव्हील लाईन येथील २, योजना पार्क येथील १, गणेशपेठ येथील १, नालंदा नगर येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, वारा येथील १, पिंपळगाव येथील २, तोंडगाव येथील १, भटउमरा येथील १, अनसिंग येथील २, शिरसाळा येथील १, देपूळ येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, तामसी येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, गैबीपुरा येथील १, कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, हिवरा पेन येथील १, कोयाळी येथील १, गोवर्धन येथील १, सवड येथील १, पेनबोरी येथील १, भरजहांगीर येथील २, करडा येथील २, एकलासपूर येथील १, जवळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, वसंतवाडी येथील १, कार्ली येथील १, शेलूबाजार येथील १, वनोजा येथील १, मोहरी येथील १, पेडगाव येथील १, मालेगाव शहरातील ७, वारंगी येथील १, कोठा येथील १, अमानी येथील १, मुठा येथील २, दापुरी येथील १, करंजी येथील १, शिरपूर जैन येथील १, मानोरा तालुक्यातील वार्डा येथील १, गिरोली येथील १, कारंजा_लाड शहरातील बाबारे कॉलनी परिसरातील १, लोकमान्य नगर परिसरातील ३, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील १, टिळक चौक परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, पारवा पोहर येथील २, पिंप्री वरघट येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ८८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत उपचारा दरम्यान अरक, केकतउमरा, रिसोड व पांगरी कुटे येथील प्रत्येकी १ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.