शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी रुपये 50 हजार मदत त्वरीत द्यावी
भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे व पदाधिकारी यांचे कारंजा तहसीलदारांना निवेदन
कारंजा :-(संदीप क़ुर्हे) दि २५
कारंजा तालुुक भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे व पदाधिकारी यांनी तहसीलदार कारंजा यांना निवेदन देऊन उडीद, मुंग, सोयाबीन, कपासी या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कारंजा तालुक्यात पाळीव जनावरांवर गंभीर रोगाची लागण सुरू आहे त्याकरिता प्रती जनावर 5 हजार रुपयांची मदत देण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, कारंजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत धार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उडीद, मुंग पीक त्याचे संपूर्णतया नुकसान झाले. त्याच प्रमाणे कपासी पिकाचे नुकसान झाले असुन कपासी पिकाच्या बोंड्याचे नुकसान झाले. तसेच सोयाबीन पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे .वर उल्लेखित सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले तरी शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यास विनाविलंब हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे ती त्वरीत पूर्ण करावी.
तालुक्यात पाळीव जनावर यांचेवर सुद्धा गंभीर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून जनावरे बिमार होत आहे त्या करीता सुद्धा पाळीव जनावर बाळगुन असणाऱ्यांना ज्यांची जनावरे बिमार आहेत त्यांना प्रती जनावर रुपये पाच हजार मदत देण्यात यावी ही आमची मागणी असुन त्वरीत पूर्ण करावी .
आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, आम्ही उपरोक्त केलेल्या मागण्या त्वरित मंजुर करून शेतकऱ्यास न्याय द्यावा .तसेच आमचे मागण्याचे हे निवेदन आपले मार्फत शासनास देऊन आम्ही करीत असलेल्या वास्तविक मागण्या या सध्य परिस्थीत शेतकऱ्यांकरीता मान्य होणे अतिआवश्यक असल्याने या मागण्याची गांभीर्याने दखल घ्यावी व शेतकरी हित जोपासावे.
आम्ही करित असलेल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
निवेदन देतेवेळी सर्वश्री भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे,जिल्हा उपाध्यक्ष जयकीसन राठोड, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, भाजयुमो अध्यक्ष मंगेश धाने,तालुका उपाध्यक्ष रामकीसन चव्हाण, राजू गाढवे, पं स सदस्य शुभम बोनके ,सुरेश गिरमकार,विनोद तायडे, किसान आघाडी अध्यक्ष सुभाष घोडे ,वीरेंद्र पवार जमाती अध्यक्ष,दिलीप सावरकर,चंदू भिंगारे, गणेश राठोड, दीपक गुघाणे, राजू भिंगारे,सरपंच संकेत नाखले,दत्ता दबळे, रवी भाऊ भुते, रणजित रोतेले, स्वप्नील चौधरी, अक्षय भेंडे, प्रवीण भेंडे ,अक्षय राऊत,संजय करडे, मंगेश करडे आदींसह अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते.