रैपिड एंटीजन टेस्ट चा २ रा टप्पा २३ सप्टेंबर पासुन २९ सप्टेंबर पासुन दुकानदारानी रैपिड टेस्टिंग ला सहकार्य करावे-- धीरज मांजरे तहसीलदार कारंजा

रैपिड एंटीजन टेस्ट चा २ रा टप्पा २३ सप्टेंबर पासुन २९ सप्टेंबर पासुन 


      दुकानदारानी रैपिड टेस्टिंग ला सहकार्य करावे-- धीरज मांजरे तहसीलदार कारंजा


कारंजा :(संदीप क़ुर्हे) दि २२


     अनलॉक -४ मुळे सर्वत्र सर्वच व्यवहार हे सुरु झाले असून शहरात नागरिकांची सुद्धा आवागमन वाढली आहे तसेच कारंजा शहरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता खबरदारी म्हणून कोरोनाची टेस्ट वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे असतांना जिल्हाधिकारी यांचे आदेशावरुन कारंजा शहरात पहिल्या ५ दिवसीय एंटीजन रैपिड टेस्ट शीबरा नंतर आता २ रा टप्पा आयोजीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे हा दूसरा टप्पा उदयापासुन म्हणजे दि २३ पासुन २६ सप्टेम्बर पर्यंत सर्व दिवस स्थानिक मूलजी जेठा शाळे मध्ये आयोजित केले आहे या शिबिरा मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत व त्या ठिकाणी संबधित प्रतिस्ठान मालकानी दुकांनधारकानी आपली कोरोना टेस्ट करने बंधनकारक आहे तरी संधिचा लाभ घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे