कारंजा नगर पालिका क्षेत्रातील प्रभाग ७ मध्ये प्रभागातील सेना भाजपा नगरसेवकांची विकास कामात भेदभाव करत असल्याची चर्चा
कारंजा: ( विशेष प्रतिनीधि) दि १४
कारंजातील सेना भाजपा चे नगरसेवक त्यांच्याच प्रभागात विकास कामा मध्ये होत असलेल्या कामात भेदभाव करीत असल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे प्रभागातच काही कामे सुद्धा ही निकृष्ठ दर्जाची झाल्याची चर्चा आहे फेब्रूवारी २०१९ मध्ये मंजूर झालेल्या विकास कामा करीता भाजपा आमदार राजेन्द्रजी पाटनी यांनी प्रभाग ७ मधील संतोषी माता कॉलोनी मधील विकास कामा करीता फेब्रूवारी मध्ये ६० लाख मंजूर केले होते त्यामध्ये फेवर ब्लॉक ,रस्ता डाबरीकरण,नाली बांधकाम आदि विविध कामे होणार होती . ती आजही दीड वर्षा मध्ये पूर्ण झाली नाहीत अर्धवट कामाबद्दल संबधित नगरसेवक पालिका प्रशासनला जवाबदार मानत आहेत शिवाय पालकमंत्री संजयभाऊ राठोड यानी सेना नगरसेवकाला प्रभागामध्ये विकास कामा करिता लाखोचा निधी दिला असल्याची माहिती आहे ह्या निधी मधील कामात सुद्धा अनियमितता असल्याचे बोलल्या जात आहे संतोषी माता कॉलोनी मधील आजही बऱ्याच समस्या तोंड काढून उभ्या आहे ज्यामध्ये नाली बांधकाम,फेवर ब्लॉक, ओपन स्पेस मधील कुंपन सांड़पाण्याचे व्हिलेवाट लावणे आदिनचा समावेश आहे
तरी या नगरसेवकांनी कामात भेदभाव न करता कामे करण्याची मागणी प्रभागातील नागरिकांची मागणी आहे पालिका प्रशासन तसेच भाजपा आमदार महोदयानी याकडे लक्ष्य घालण्याची सुद्धा गरज आहे