वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह २२९८ रुग्ण तर १६१६ रुग्णाची कोरोनावर मात,४३ रुग्णाचा मृत्यु तर ६३८ उपचार घेणारे रुग्ण
कारंजा: (संदीप क़ुर्हे) ८ सप्टे २०
जिल्ह्यात जिल्हा प्रशासना ने दिलेल्या माहिती नुसार आज आणखी ५३ व्यक्ती बाधित झाले असून त्यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील १२, लाखाळा परिसरातील ४, देवपेठ येथील १, रावले नगर येथील ३, चरखा ले-आऊट परिसरातील २, आययुडीपी परिसरातील १, पाटणी चौक परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, शिरपुटी येथील १, देपूळ येथील १, मालेगाव शहरातील अंकल नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मैराळडोह येथील २, मानोरा शहरातील १, विळेगाव येथील १, विठोली येथील १, खंबाळा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, किन्ही रोड परिसरातील १, बजरंग पेठ परिसरातील १, शेमलाई येथील १, रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरातील १, देशमुख गल्ली येथील २, लोणी फाटा येथील २, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील १, केनवड येथील १, मंगरुळपीर शहरातील १, शेलुबाजार येथील १, चिचखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
२७ जणांना डिस्चार्ज
वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, सिव्हिल लाईन येथील ३, नंदीपेठ येथील १, देवपेठ येथील १, कोकलगाव येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, काटा येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, धोबी गल्ली येथील ३, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील ७, शिरपूर जैन येथील २, पांगरी कुटे येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी अँटीजेन रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या कारंजा लाड तालुक्यातील धामणी येथील ६७ वर्षीय महिलेचा काल, ७ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच ४ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व ६ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील निरंकारी भवन परिसरातील ७८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.