जिल्ह्यात पुन्हा ९९ कोरोना बाधित तर ९५ जण कोरोनामुक्त

   जिल्ह्यात पुन्हा ९९ कोरोना बाधित तर ९५ जण कोरोनामुक्त


कारंजा (संदीप क़ुर्हे) दि २४


     जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार आज पुन्हा ९९ बाधीत आढळले असून ९५ कोरोनामुक्त झाले आहेत


     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिंधी कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील १, पाटणी चौक येथील १, रावले नगर येथील १, लाखाळा परिसरातील ४, काळे फाईल येथील २, योजना पार्क परिसरातील २, सुदर्शन नगर येथील १, आययुडीपी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू खुर्द येथील १, शिरपुटी येथील १, गोंडेगाव येथील १, टो येथील ६, शेलगाव येथील २, मानोरा शहरातील १, हातोली येथील ३, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, लोणी फाटा येथील २, बेलखेडा येथील २, पिंप्री सरहद येथील १०, देगाव येथील २, नेतान्सा येथील २, लोणी येथील १, हराळ येथील १, येवती येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील २, माळशेलू येथील ६, धोत्रा येथील २, कासोळा येथील १, मालेगाव शहरातील ६, शिरपूर जैन येथील १, डव्हा येथील २, इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील ३, टिळक चौक येथील ४, आनंद नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पारवा कोहर येथील १, कामरगाव येथील ३, मेहा येथील २, धनज येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९५ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, वाशिम येथील ४० व ७० वर्षीय पुरुष आणि कारंजा लाड येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


     कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ३८८३


ऍक्टिव्ह – ८४८


डिस्चार्ज – २९५७


मृत्यू – ७७ 


इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)