दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


कारंजा :-(कारंजा वृत्तकेसरी)


     समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती कारंजा येथे दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार संपन्न झाला.


      सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी कालिदास तापी तर प्रमुख उपस्थिती म्हणुन सभापती रविता रोकडे गटशिक्षणाधिकारी एस.एम अघडते व मुख्य़ाध्यापक विजय भड उपस्थित होते.


 


    इय्यता १० वीत यश मिळवणारे शाश्वती गाढवे,अखिलेश भुयार,गोकुळ राठोड,नंदिनी कान्हेरे,मयुरी बलंग,मोहिनी इंगोले,काजी हबिऊल्ला,इमरान खान अ.खान,दिक्षा खोलगडे, सादीया नौरंगाबादी,सुजित खाडे, विश्वजित जाधव, नाजिम पप्पुवाले,राजु कुसळकर,अश्विनी कानपुरे तर इयत्ता १२ वीत यश मिळवणारे विशाल इंगळे,राधिका महाजन व नवोदयला पात्र ठरलेला आर्यन जयस्वाल यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभाला उपस्थित दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सत्कार केल्याबद्दल आनंद व आभार व्यक्त केला.कार्यकमाला कार्यालयातील विस्तार अधिकारी सुनिल उपाध्ये संतोष इंगोले,मनोज देशमुख,महेंद्र उघडे,प्रशांत खडसे,नितिन केळतकर,रजनी चारथळ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे संचलन अतुल गणविर तर आभार गोपाल खाडे यांनी मानले.


समावेशीत शिक्षण विभागाचे अतुल गणविर,मोनाली दाभाडे,सचिन घुले,विनोद खिराडे,आशिष अथिलकर,धिरज अंभोरे,ज्योती कोपनर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता अथक परिश्रम घेतले