आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचा आंकड़ा ९२ ने फुगला तर कारंजात एका दिवसात २९ रुग्णाची वाढ

आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचा आंकड़ा ९२ ने फुगला तर कारंजात एका दिवसात २९ रुग्णाची वाढ


नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन


बाधितांची संपर्कातील वाढत्या रुग्ण संख्या पाहता प्रशासन अचंबित?



कारंजा : ( कारंजा वृत्तकेसरी) दि ३ ऑगस्ट


       जिल्ह्या प्रशासना च्या प्राप्त माहिती नुसार आज दुपारच्या व संध्याकाळ च्या अहवालात दिवसभरात जिल्ह्यातवा वाशिम शहरातील सप्तश्रृंगी नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील पिंपळदरा/काळा कामठा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफ लाईन परिसरातील ५, पठाणपुरा परिसरातील १, गणेशनगर परिसरातील २, ब्राह्मणगल्ली येथील १, कायंदे सदन परिसरातील १ व भोकरखेड येथील २, हराळ येथील ३, कारंजा शहरातील मजीदपुरा परिसरातील ७, हातोटीपुरा परिसरातील ७, वाणीपुरा परिसरातील १, कानडीपुरा परिसरातील १, भारतीपुरा परिसरातील २, रविदास नगर येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील ३, रामासावजी चौक परिसरातील २ आणि भामदेवी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर संध्याकाळ च्या अहवाला नुसार आणखी ४५ कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत ज्यामध्ये वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील १, गवळीपुरा येथे ३, अल्लाडा प्लॉट परिसरात ३, टिळक चौक परिसरात २, ड्रीमलँड सिटी परिसरात २, अनसिंग येथे १३, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, शेंदूरजना मोरे येथील १, कारंजा शहरातील विदयाभारती कॉलनी परिसरातील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, चवरे लाईन येथील १, हातोटीपुरा येथील १, पोहा येथील २, कामगरगाव येथील १ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.


       आज २८ रुग्ण झाले कोरोनामुक्त


       मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी येथील १, नांदगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील ३, कारंजा लाड येथील इंगोले प्लॉट येथील १, वाशिम येथील स्त्री रुग्णालय परिसरातील १, रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, आसनगल्ली येथील १, महात्मा फुले नगर येथील १, मांगवाडी येथील १६ व गोरखवाडी येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 कारंजातील कोरोनाचा फुगलेला आंकड़ा हा यापुर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील असल्याचे वृत्त आहे