कारंजेकराना सलग तिसऱ्या दिवशीही दिलासा,
जिल्ह्यात इतर ठिकानी आणखी ५३ कोरोना बाधित तर ३१ रुग्णा ना सूटी
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि ३० ऑगस्ट
जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार आज सुद्धा कारंजेकराना कोरोनाने दिलासा दिला आहे
काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस जवळील ३, सुभाष चौक २, गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन परिसरातील १, टिळक चौक येथील २, निमजगा येथील ३, इमानदारपुरा येथील १, देवपेठ येथील १, कोकलगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथील येथील १, शेलूबाजार येथील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पसरणी येथील १, शेलुवाडा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, देशमुख गल्ली येथील १, किनखेडा येथील १६, येवती येथील २, सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
आज ३१ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील ३, टिळक चौक परिसरातील १, वारा जहांगीर परिसरातील ४, पार्डी आसरा परिसरातील ४, अनसिंग येथील १, बाभुळगाव येथील २, कारंजा लाड शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, साळीपुरा येथील २ रंगारीपुरा येथील २, सिंधी कॅम्प येथील ४, भिलखेड येथील १, पारवा येथील १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, आसेगाव पेन येथील २, धोडप येथील १ व्यक्तींना बरे झाल्याने सूटी देण्यात आली आहे.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. दरम्यान जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे दाखल झालेल्या व एँटिजेन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रिसोड तालुक्यातील खडकी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा आज, ३० ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १७२२
ऍक्टिव्ह – ४३६
डिस्चार्ज – १२५५
मृत्यू – ३० (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)