जिल्ह्यात आढळले २३ बाधीत रुग्ण तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात सुरु आहेत ७८ बाधितावर उपचार
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी) दि ६ ऑगस्ट
जिल्ह्या माहिती कार्यालयाच्या प्राप्त माहीती नुसारआज दिवसभरात थोड़ी दिलासा दिलासादायक वृत्त आहे आज दिवसभरात जिल्ह्यामध्ये २३ बाधीत आढळले आहेत ज्या मध्ये सकाळ च्या अहवालात १७ बाधीत रुग्ण आहेत ज्यामध्ये
वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील ८, टिळक चौक परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसरातील ३, तहसील कार्यालय परिसरातील ४, कवठळ येथीळ १ अशा एकूण १७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
तसेच , आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील सकाळ नंतर पुन्हा ५ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
५ रुग्णाची कोरोना वर मात
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, नांदगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील १ आणि कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ८१३
ऍक्टिव्ह – ३२५
डिस्चार्ज – ४७०
मृत्यू – १७ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)