वाशिम जिल्ह्यात आणखी २७ कोरोना बाधित,२५ रुग्णाची कोरोनावर मात तर कारंजातील ६९ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान वाशिम येथे मृत्यू .
कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २६ ऑगस्ट
जिल्ह्या प्रशासना कडून प्राप्त २७ बधितांची नोंद झाली २५रुग्णाची कोरोनातून सुटका झाली आहे माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात वाशिम शहरातील सुभाष चौक येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, शुक्रवार पेठ येथील १, निमजगाव येथील १, जवळा येथील १, खारोळा येथील १, रिसोड शहरातील अग्रवाल भवन समोरील परिसरातील १, आंबेडकर नगर परिसरातील १, सवड येथील ३, आसेगाव पेन येथील १, मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. १७ येथील १, डॉ. माने हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडा येथील १, मारसूळ येथील १, दुधाळा येथील ३, मैराळडोह येथील १, मानोरा तालुक्यातील सोमनाथनगर येथील ४, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ६ कोरोना बाधितांची नोंद
आज २५ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम शहरातील चंडिकावेस परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसरातील १, खामगाव जीन परिसरातील १, कोल्ही येथील २, कारंजा_लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ४, माळीपुरा येथील १, काजळेश्वर येथील १, रिसोड तालुक्यातील मांडवा येथील १, येवती येथील १, आसेगाव पेन येथील ९, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील २ व्यक्तींना सूटी देण्यात आली आहे.
दरम्यान, काल, २५ ऑगस्ट रोजी रॅपिड एँटिजने टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या कारंजा लाड शहरातील कुंभारपुरा येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १५२८
ऍक्टिव्ह – ३७३
डिस्चार्ज – ११२७
मृत्यू – २७ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)