बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचा निकाल ९१.८९%

बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचा निकाल ९१.८९ % 


कारंजा: प्रतिनिधी/२९ जुलै


   -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर केलेले आहे. त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावार्डी चा निकाल ९१.८९% लागल्यामुळे या शाळेने आपल्या यशाची पंरपरा कायम ठेवली आहे.


      बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० ला ३७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी ३४ विद्यार्थी ऊर्त्तिण झालेत.यापैकी प्राविण्य श्रेणित १९ विद्यार्थी, प्रथम श्रेणित ११ विद्यार्थी,व्दितिय श्रेणित ०३,तर उत्तीर्ण श्रेणीत०१ विद्यार्थी उर्तिण झालेत. 


   कु.राणी संतोष ठाकरे हिने ९२.४०% गुण प्राप्त करुन विद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.तर कु.जानवी निलेश ठाकरे हीने ९१% गुण प्राप्त करुन व्दितिय, कु.दिपाली सुरेश ठाकरे हीने ९०.२०% गुण प्राप्त करुन तूतीय, प्रणय अजय ठाकरे याने ८५.८०% गुण प्राप्त करुन चतुर्थ,कु.ईश्वरी दिपक कोल्हे हीने ८५.६०% गुण प्राप्त करुन पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.


     विद्यालयातुन मराठी मध्ये सर्वाधिक गुण दिपाली ठाकरे ९५,हिंदि मध्ये राणी ठाकरे ९३,इंग्रजी मध्ये जानवी ठाकरे ८९,गणित मध्ये जानवी ठाकरे ९७, विज्ञान मध्ये जानवी ठाकरे व दिपाली ठाकरे यांना ८७, तर सामाजिक शास्त्र मध्ये जानवी ठाकरे व राणी ठाकरे यांना ९१ गुण मिळाले आहेत.


         सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अंभिनंदन संस्थेचे अध्यक्ष केशवराव खोपे,संस्थेचे संचालक देविदास काळबांडे, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी अोलिवकर,गोपाल काकड,अनिल हजारे तसेच शिक्षकेत्तर कर्म.आणि गावंकरी मंडळीने केले.