कोरोना काळात खाजगी शाळानी फी वाढ करुन पालकांना फी भरण्याचा तगादा लावू नये , अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मनसे चा इशारा
कारंजा:(कारंजा वृत्तकेसरी)
कोरोना काळात खाजगी शाळानी फी वाढ करुन पालकांना फी भरण्याचा तगादा लावू नये , अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मनसे ने इशारा दिला आहे
मनसे ने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना च्या काळात सम्पूर्ण जग विचलीत झाले आहे परिणामी अर्थव्यवस्था जगभर खिळखिळी झाली आहे सर्व लाहनमोठे व्यवसाय बंद पडले आहेत शालेय शिक्षण पूर्णपणे सुरु होइलच याची खात्री नाही .
तरीही कारंजा तालुक्यातील काही खाजगी शाळा ह्या आपल्या मनमानी ने फी वाढ करुण फी भरन्यास पालकाना सूचना पाठवित आहेत अगोदरच काम धंदे बंद आहेत पालक कोठुन फी भरणार शासनाचा कोणतीही फी वाढ न करण्याच्या व फी भरण्याचा पालकाना कोणताही तकादा लावू नये असा आदेश असताना सुद्धा शाळा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचा आरोप मनसे नी आपल्या निवेदनात केला आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे शिक्षण विभागाने या संदर्भात फी वाढ व फी भरण्या संबंधि तगादा न लावण्याचा आदेश तालुक्यातील सर्व खाजगी शाळाना आदेश द्यावेत अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन छेड़ूँ असा इशारा मनसे जिल्ह्या उपाध्यक्ष अमोल लुलेकर,कपिल महाजन मनसे जिल्ह्या संघटक यानी दिला आहे यावेळी गगन रॉय, शेखर जिरापुरे, इशांत देशमुख,अरुण बिकड, नरेंद्र गाडगे,भारत हांडगे आदि उपस्थित होते.