घंटानाद आंदोलनाला कारंजा तालुक्यात व शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद!
( संदीप क़ुर्हे)
कारंजा: (लाड)
लोकांना रोजीरोटी देणार्या प्रत्येक क्षेत्राची बंद राहण्याची क्षमता आता संपलेली आहे. प्रार्थना स्थळांवर ही अनेक कुटुंबांचे जीवन निर्भर आहे, त्यांची ओढाताण आता थांबायला हवी. ५ महिन्यांपासूनच्या या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडायला आध्यात्मिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक ती नियमावली लागू करून सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करावीत. या मागणीसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहरात ललित चांडक तर तालुक्यात डॉ.राजीव काळे यांच्या नेतृत्वात प्रमुख मंदिरासमोर कुंभकर्णापेक्षा गाढ झोपेत असलेल्या सरकारला जाग करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
दारूची दुकाने लॉकडाऊन मध्ये उघडायची परवानगी? बसने अनोळखी लोकांनी एकत्र प्रवास करायला पास गरजेचा नाही मात्र एकाच कुटुंबातील व्यक्तींनी खाजगी गाडीने प्रवास करायला पास आवश्यक? प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे साफ दुर्लक्ष आणि अनलॉकडाऊन सुरू झाल्यावर मात्र निर्बंधांवर निर्बंध. आता आवश्यकता आहे ती काटेकोर नियमावली सह गोष्टी पूर्ववत करण्याची पण झोपी गेलेल्या सरकारला जनतेच्या हालअपेष्टांची चिंताच नसल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन आता तरी मा.मुख्यमंत्र्यांनी योग्य नियोजन करून सर्व धार्मिक प्रार्थना स्थळे सुरू करावी अशी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी केली आहे.
कारंजा शहरातील श्री.गुरूमंदिर, मोठे राममंदिर, छोटे राममंदिर, जैन मंदिर, विठ्ठल मंदिर, झुलेलाल मंदिर, एकविरा देवी मंदिर, माँ भवानी संस्थान, श्री.हनुमान मंदिर, श्री.साई मंदिर यासह त्या-त्या प्रभागातील भाविक भक्त तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कारंजा शहरात भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजय काळे, महिला जिल्हाध्यक्ष सौ.मिनाताई काळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, जिल्हा संपर्क प्रमुख संदीप गढवाले, महेंद्र लोडाया, शहर सरचिटणीस शशिकांत वेळुकर, रंजीत रोतेले, शहर उपाध्यक्ष अविनाश फुलंबरकर, सौ.प्राजक्ता माहितकर, कुणाल महाजन, मोहन पंजवाणी, प्रसन्न साखरकर, श्रीकृष्ण नांदेडकर, भाजयुमो शहराध्यक्ष अमोल गढवाले, सवीज जगताप, संदीप कुर्हे, ललित तिवारी, सोशल मिडीया प्रमुख जिग्नेश लोडाया, संदीप काळे, सुनिल जवाहरमलाणी, समिर देशपांडे, चिटणीस निखील घुडे, कोषाध्यक्ष बंट्टी गाडगे, अतुल धाकतोड, ज्ञानेश्वर काळे, चंदु वारे, सुरेश गिरमकार, पं.स.सदसय रूपेश शहाकार, महिला तालुकाध्यक्षा सौ.शारदाताई बांडे, चिटणीस सौ.प्रिती धाकतोड आदी प्रमुख पदाधिकार्यांनी शहरातील प्रमुख मंदिरात तसेच त्या-त्या प्रभागात कार्यकर्त्यांसह भाविकभक्तांसोबत सहभागी झाले होते.
*भाजपाचे धानोरा येथील मंदिरा समोर जोरदार घंटानाद आंदोलन*
कारंजा तालुक्यातील धानोरा ताथोड येथे श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दारू नको, भक्तीचे दार उघड असे घंटा नाद करून आंदोलन करण्यात आले .हे आंदोलन आमदार मा. श्री. राजेंद्रजी पाटणी ,जिल्हाध्यक्ष भाजपा व तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांचे मार्गदर्शनात तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांचे नेतृत्वात मंदिराच्या बाहेर सोशल डिस्टन्स चे पालन करून मोठ्या संख्येने अखंड घंटानाद करून राज्य सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.मदिरेचे दुकान उघडे केले पण देवाचे मंदीर बंद असल्यामुळे ते त्वरित उघडण्यात यावेत .सरकारला जाग न आल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा श्री राजीव भेंडे तालुका उपाध्यक्ष भाजपा यांनी सरकारला यावेळी दिला. हे सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात विशेष सहभागी श्री संजय भेंडे स्विय सहाय्यक ,संकेत नाखले सरपंच इंझा, शिवम बोनके पं स सदस्य, हर्षल पाटील काटोले, संतरामजी बोनके, प्रवीण भेंडे,तुकाराम खोडे,दत्ताभाऊ लाडोने,गणेश बागडे, अनंता लाडोने, कैलाश कापसे, परमेश्वर आमले, अवधुत ढवळे,व बहुसंख्य ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.