आज जिल्ह्यात २६ रुग्णाची वाढ, तर ८ रुग्णाची कोरोना वर मात ,कारंजात ४४ रुग्णावर उपचार

वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात २६ नवीन बाधीत रुग्णा ची वाढ  


८, रुग्णाची कोरोनावर मात


एकूण पॉझिटिव्ह – ६२०


ऍक्टिव्ह – २१०


डिस्चार्ज – ३९४


मृत्यू – १५ (+१)


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि १ ऑगस्ट


जिल्ह्या माहिती कार्यालय कडून प्राप्त अहवालात


आज सकाळी च्या अहवाला मध्ये  कारंजा लाड येथील अशोक नगर परिसरातील ६, शिक्षक कॉलनी परिसरातील ३, शिंदे कॉलनी परिसरातील ३, बायपास परिसरातील १, आनंद नगर परिसरातील १, कारंजा तालुक्यातील मोरंबी येथील १ व कामरगाव येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील २ अशा आणखी एकूण १८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


      जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ८ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कारंजा_लाड शहरातील संभाजी नगर येथील १, शांतीनगर येथील १, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील २, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील १ आणि मंगरूळपीर तालुक्यातील नांदगाव येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


तसेच पुन्हा दुपारी आलेल्या अहवालात रुग्णाची वाढती संख्या पाहण्यास मिळाली आहे


  कारंजातील अशोक नगर येथील १, हाटोटीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील १ असे एकूण ८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


         "१ जून 20 ते १ ऑगस्ट 20 पर्यन्त उपजिल्हा रुग्णालयात एकूण रैपिड टेस्ट ह्या 65 केल्या गेल्या ज्यामध्ये 8 हे कोरोना बाधीत आढळले तर एकूण स्वैब नमूने 243 घेण्यात आले ज्यामध्ये 38 रुग्ण कोरो बाधीत निघाले असून 48 चाचणी अहवाल प्रलंबित असून आज रोजी 44 रुग्ण कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत  आहेत"


         डॉ भाऊसाहेब लहाने


         वैद्यकीय अधीक्षक ,उपजिल्हा रुग्णालय               कारंजा   


        "तुळजा भवानी क्वारंटाइन सेंटर मध्ये ४४ तर मदरशा  क्वारंटाइन सेंटर मध्ये १७  असे ६१ संशयित रुग्ण असून यांचे सर्व चाचणी अहवाल प्रलंबित आहेत'"(चाचणी अहवाल १ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत  प्रलंबित)


        डॉ किरण जाधव


तालुका आरोग्य अधिकारी कारंजा